आमिरने करीनाला 'व्हॅलेंटाईन डे' विश केलं आणि म्हणला....

वृत्तसंस्था
Friday, 14 February 2020

'व्हॅलेंटाईन डे'निमित्त लाल सिंग चढ्ढाचं पुढचं पोस्टर आमीरने शेअर केलंय. यात त्याच्यासह त्याची हिरोईनही आहे...

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनेक ठिकणी तो वेगवेगळ्या लूकमध्ये पोहोचतो आणि लोकांना भेटतो. त्याच्या प्रमोशनच्या या हटके स्टाईलमुळेच तो चाहत्यांची मनं जिंकतो. अशातच त्याने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त लाल सिंग चढ्ढाचं पुढचं पोस्टर शेअर केलंय. यात त्याच्यासह त्याची हिरोईनही आहे...

Laal Singh Chaddha : 'सत् श्री अकालजी, मायसेल्फ लालसिंग चढ्ढा!'

लाल सिंग चढ्ढाच्या या पोस्टरमध्ये आमीर खान मागून दिसतोय. समोरून त्याला करीनाने मिठी मारली आहे. या चित्रपटात करीना त्याची मुख्य नायिका असेल. या फोटोला त्याने 'पा लेने की बेचैनी, और खो देने का डर... बस इतना सा है, ज़िंदगी का सफर।' असं कप्शन दिलंय. तर मजेशीर गोष्ट म्हणजे त्याने करीनाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्यात व 'तुझ्यासोबत प्रत्येक चित्रपटात रोमान्स करायची संधी मिळो' असंही लिहलंय.

आमिरचे एकाच सिनेमात तीन वेगळे लुक, पाहा फोटो

आमीरने 'लाल सिंग चढ्ढा'च्या कथानकाबाबत किंवा त्याच्या भूमिकेबाबत आतापर्यंत काहीच उघड केले नाही, पण हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटावरून घेतला आहे, अशी चर्चा आहे. आमीरने या चित्रपटासाठी 20 किलो वजन कमी केले आहे. यात आमीर एका तरूणाची भूमिका साकारतच असल्याने त्याला तसे दिसणे गरजेचे होते, त्यामुळे त्याने डाएटवर भर दिलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aamir Khan shared Laal singh Chaddha next poster with Kareena Kapoor