अभिनेता आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, स्वतः आमीरने दिली माहिती

AAMIR KHAN
AAMIR KHAN

मुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग काही केल्या कमी होत नाहीये. दिवसेंदिवस याचा प्रभाव कमी व्हायचा सोडून वाढतंच चालला आहे. सामान्य माणसांसोबतंच बॉलीवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाने सोडलेलं नाही. नुकतंच अभिनेता आमीर खानच्या घरातंही कोरोनाने शिरकाव केल्याचं समोर येतंय. स्वतः आमीरने याबाबत एक पत्रक जाहीर करुन माहिती दिली आहे.

आमीर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्रक जाहीर केलं आहे. यात आमीरने त्याच्या घरातील कर्मचा-यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. तसंच घरातील व्यक्तींच्या रिपोर्टबाबतही आमीरने यात माहिती दिली आहे.

आमीरने जाहीर केलेल्या या पत्रात लिहिलं आहे की, 'माझ्या घरातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना लगेचच क्वारंटाईन केलं गेलं आहे. बीएमसीचे अधिकारी त्यांना लगेचच पुढील उपचारांसाठी घेऊन गेले आहेत. बीएमसीने त्यांची व्यवस्थित काळजी घेतल्याने आणि इमारतीचं लगेचच निर्जंतुकीकरण केल्याने मी त्यांचा आभारी आहे.' 

आमीरने पुढे असंही सांगितलं आहे की, त्याच्या घरातील इतर व्यक्तींची कोविड-१९ टेस्ट निगेटीव्ह आली आहे मात्र आमीरची आई जीनत हुसैन यांचा अजुन रिपोर्ट येणं बाकी आहे. आमीरने लिहिलंय, 'बाकी आम्हा सगळ्यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. आता मी माझ्या आईची टेस्ट करत आहे. ती एकटीच बाकी आहे. कृपया प्रार्थना करा की तिचा रिपोर्ट निगेटीव्ह येईल. मी पुन्हा एकदा बीएमसीचे आभार मानतो की त्यांनी अगदी लगेचच, प्रोफेशनल आणि काळजीच्या स्वरुपात आमची मदत केली.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Azad, me, K, Amma and Appa.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

या आधी बोनी कपूर यांच्या घरातील कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरातील इतरांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. काही दिवसांनी बोनी कपूर यांनी त्यांचे कर्मचारी व्यवस्थित झाल्याची माहिती देखील दिली होती.    

aamir khan staff members test positive for corona actor says pray for my mother  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com