'हे' १० सिनेमे आणि वेबसिरीज चुकुनही ऑनलाईन पाहू नका, महाराष्ट्र सायबरचा अलर्ट

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

इंटरनेटवरुन आवडते सिनेमे डाऊनलोड करुन पाहणा-यांची संख्या सध्या वाढली आहे आणि म्हणूनंच याचाच गैरफायदा घेतायेत काही सायबर भामटे. तुम्ही देखील अशाच काही फ्री वेबसाईट्सवरुन वेबसिरीज किंवा सिनेमे पाहत असाल तर सावधान !

मुंबई- लॉकडाऊनमुळे घरी असलेल्यांसाठी विरंगुळा म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. यावर वेबसिरीज बघणा-यांचा मोठा वर्ग आहे. तर लॉकडाऊनमुळे ऑनलाईन सिनेमे बघण्याकडे देखील अनेक घरबसलेल्या लोकांचा कल वाढला होता. इंटरनेटवरुन आवडते सिनेमे डाऊनलोड करुन पाहणा-यांची संख्या सध्या वाढली आहे आणि म्हणूनंच याचाच गैरफायदा घेतायेत काही सायबर भामटे. तुम्ही देखील अशाच काही फ्री वेबसाईट्सवरुन वेबसिरीज किंवा सिनेमे पाहत असाल तर सावधान !

हे ही वाचा:  'लक्ष्मीबॉम्ब', 'भुज' सारख्या ७ बड्या सिनेमांच्या होम डिलीवरीचं काऊंटडाऊन सुरु..

एखाद्या व्यक्ती जेव्हा फ्रि डाऊनलोड वरुन एखादा सिनेमा किंवा वेबसिरीज पाहण्यासाठी क्लिक करते तेव्हा त्या व्यक्तीच्या नकळत एक मालवेअर डाऊनलोड होते. हे मालवेअर तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबरच्या भामट्यांना पाठवतात. आणि मग हे भामटे याचा गैरवापर करुन खंडणीसाठी नागरिकांना त्रास देतात.

लॉकडाऊनच्या काळात या भामट्यांचं ऑनलाईन व्यवहारांमुळे चांगलंच फावलंय. ऑनलाईन सिनेमे पाहण्याच्या नादात तुमची वैयक्तिक-खाजगी माहिती चोरीला जाऊ शकते. हॅकर्स यावर लक्ष ठेवून असतात. ही परिस्थिती पाहता महाराष्ट सरकारच्या सायबर विभागाने अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भाची प्रेस नोट देखील महाराष्ट्र सायबर क्राईमने प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र सायबर खात्याने काही वेबसिरीज आणि सिनेमांची यादी देखील जाहीर केली आहे.

 

सिनेमे

मर्दानी २

झुटोपिया

जवानी जानेमन

छपाक

लव्ह आज कल

इन्सेप्शन

बाहुबली

रजनीगंधा

गली बॉय

बाला

 

वेबसिरीज

दिल्ली क्राईम

ब्रुकलीन नाईण्टी नाईन

पंचायत

अकूरी

फायदा

घोल

माईण्ड हंटर

नार्कोस

देव लोक

लॉस्ट

वर जाहीर केलेल्या यादीमधील कोणतीही वेबसिरीज अथवा सिनेमे तुम्ही पाहत असाल तर आत्ताच सावध व्हा. लोकांना फसवण्यासाठी हॅकर्सनी या वेबसिरीज आणि सिनेमांचा वापर केल्याचं सायबर टीमच्या तपासात आढळून आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायरबरने अशा मोफत वेबसाईटवर सिनेमे आणि वेबसिरीज पाहणं टाळण्याची विनंती केली आहे. एखादा सिनेमा किंवा वेबसिरीज प्ले करण्यासाठी तुमच्याकडे काही परवानगी मागत असेल तर ती देऊ नका. खात्रीशीर आणि अधिकृत वेबसाईटवरुनंच सिनेमे आणि वेबसिरीज पाहा. मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये अपडेटेड एँटीव्हायरस टाकण्याची सूचना महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आय जी एसएससी यादव यांनी दिल्या आहेत. 

dont download this free movies web series to avoid online fraud  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dont download this free movies web series to avoid online fraud