Ganesh Chaturthi 2023: शाहरुख, सलमाननंतर आमिर खानही गणपती दर्शनासाठी पोहचला वर्षा बंगल्यावर!

Ganesh Chaturthi 2023
Aamir Khan visits CM Eknath Shinde's residence for Ganpati Darshan
Ganesh Chaturthi 2023 Aamir Khan visits CM Eknath Shinde's residence for Ganpati DarshanEsakal

Aamir Khan Ganpati Darshan: सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरु आहे. बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने जात आहेत. आता बाप्पाच्या विसर्जनासाठी काहीच तास शिल्लक आहे. त्यामुळे भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहे.

त्यातच अनेक नामांकित व्यक्तीच्या घरी गणेशोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपती आरती आणि उत्सवासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Ganesh Chaturthi 2023
Aamir Khan visits CM Eknath Shinde's residence for Ganpati Darshan
Aankh Micholi Trailer: लग्नासाठी मुलगी तयार पण झालीय एक गडबड, आँख मिचोली चा तुफान कॉमेडी ट्रेलर पाहाच

यापुर्वी बॉलिवूडचा दबंग सलमान खान शाहरुख खान अनेक स्टार्स यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जात गणपतीचे दर्शन घेतले होते. आता त्यातच बॉलिवूड अभिनेता आमिर खानने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट दिली.

गणेश चतुर्थी उत्सवासाठी आमिर शिंदेच्या घरी गेला होता. यावेळी आमिरच्या हातात प्रसादाचा ताटही होता. निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांनी आमिरचे स्वागत केले.

Ganesh Chaturthi 2023
Aamir Khan visits CM Eknath Shinde's residence for Ganpati Darshan
TMKUC:मला असित मोदींनी असभ्य भाषेत... तारक मेहता सोडल्यानंतर शैलेश लोढाने सांगितलं खरं कारण

गणेश दर्शनासाठी त्याने पांढरा कुर्ता आणि पिवळी पँट परिधान केली होती. सध्या आमिरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यापुर्वी आमिर खान 26 सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांच्या निवासस्थानी जाताना दिसला होता. त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. त्यांने गणपती बाप्पाची पूजा केली आणि फोटो देखील काढले. पुष्पगुच्छ आणि महादेवाचा फोटो आमिरला यावेळी देण्यात आला.

Ganesh Chaturthi 2023
Aamir Khan visits CM Eknath Shinde's residence for Ganpati Darshan
International Emmy Awards 2023: प्रतिष्ठित एमी अवॉर्ड्ससाठी नामांकनांची घोषणा; 'या' भारतीय कलाकारांचा आहे समावेश!

आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर त्याने दिग्दर्शक राजकुमार संतोषीसोबत दोन चित्रपटात साइन केले आहे. एका चित्रपटात तो मुख्य भुमिकेत असेल तर दुसऱ्या चित्रपटाची आमिर निर्मिती करणार आहे.

आमिर खान आरएस प्रसन्ना दिग्दर्शित चॅम्पियन्स या चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. जानेवारी 2024 मध्ये या चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com