esakal | आमिरच्या बॉडीगार्डचा पगार मुंबईतील 2 बीएचके इतका?
sakal

बोलून बातमी शोधा

आमिरच्या बॉडीगार्डचा पगार मुंबईतील 2 बीएचके इतका?

आमिरच्या बॉडीगार्डचा पगार मुंबईतील 2 बीएचके इतका?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबईत - काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या बॉडीगार्डला (bodygaurd) असणाऱ्या पगारावरुन मोठा वाद झाला होता. त्या बॉडीगार्डन आपल्या पगाराचा आकडा सांगितला आणि चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर बिग बी यांनी त्याला कामावरुन कमी केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ती चर्चा थंड होत नाही तोच आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या बॉडीगार्डला असणाऱ्या पगाराचा आकडा समोर आला आहे. त्याचा पगार इतका आहे की, तेवढ्या किंमतीत मुंबईत 2 बीएचके फ्लॅट येऊ शकतो. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. आमीरच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास तो लवकरच त्याच्या लाल सिंग चढ्ढा नावाच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्सच्या (tom hanks) फॉरेस्ट गंप नावाच्या चित्रपटाचा तो रिमेक असल्याचे सांगितलं जात आहे.

डीएनए नानाच्या इंग्रजी वृत्तपत्रानं आमीर खानच्या बॉडीगार्डविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्या नुसार आमीरचा पर्सनल बॉडीगार्ड हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. सध्या त्याचा जो बॉडीगार्ड आहे तो पूर्वी प्रोफेशनल बॉडीबिल्डर होता. केवळ बॉलीवू़डच नाही तर मोठमोठ्या राजकीय नेत्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज आहे. त्यांच्या सुरक्षेचा खर्च हा सरकारच्या तिजोरीतून होतो. काही सेलिब्रेटींचाही यात समावेश आहे. दुसरीकडे बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी आपल्या सिक्युरिटीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. आमिर खान हे देखील त्यांच्यातील एक नाव आहे.

बॉलीवूड सेलिब्रेटींची लोकप्रियता पाहता त्यांना सुरक्षारक्षकांची गरज भासते. त्यांचा समाजात असणारा वावर लक्षात घेता त्यांच्यासाठी ही महत्वाची गोष्टही आहे. मात्र त्यावर होणारा खर्च हा त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वादही होतो. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या बॉडीगार्डला किती पगार आहे, याविषयी त्यांना जाणून घ्यायला आवडते. आमिरच्या पर्सनल बॉडीगार्डचं नाव युवराज घोरपडे असे आहे. तो पहिल्यांदा बॉडीबिल्डींग करायचा. आता पूर्णवेळ आमीरचा अंगरक्षक म्हणून काम करतो. वयाच्या 16 व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर युवराजनं एक सुरक्षा एजन्सी जॉईन केली होती. त्यानंतर त्याचं आयुष्य बदलून गेल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकामध्ये आमिरच्या बॉडीगार्डची मुलाखत छापून आली होती. त्यात त्यानं सांगितलं होतं की, माझा प्रवास हा मोठा खडतर होता. मी कशाप्रकारे बदल करायला हवा हे मला कळत नव्हतं. सरतेशेवटी मी बॉडीगार्ड होण्याचा निर्णय घेतला.

सध्या मी आमीरचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो. आमीरच्या बॉडीगार्डचं वर्षाला असणारं पॅकेज हे 2 कोटी रुपये एवढं आहे. ज्यात मुंबईमध्ये एखादा 2 बीएचके खरेदी करता येईल. मुंबईतील कांदिवली, जोगेश्वरी सारख्या भागामध्ये तेवढ्या किंमतीत मोठं घर खरेदी करता येईल. एवढा पगार आमिरच्या बॉडीगार्डला आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

हेही वाचा: 'आमिर खानने आश्वासन पूर्ण केलं असतं तर आज माझा भाऊ जिवंत असता'

हेही वाचा: 'भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस'; फैजलच्या व्हिडीओमुळे आमिर ट्रोल

loading image
go to top