Aamir Khan's daughter Ira wedding with Nupur Shikhare  sends puzzles to invite friends video viral
Aamir Khan's daughter Ira wedding with Nupur Shikhare sends puzzles to invite friends video viral Esakal

Ira Khan Wedding Invitation: लग्नाला यायचं तर ते कोडं सोडवावं लागणार, आमिरच्या लेकीच्या लग्नपत्रिकेनं वेधलं लक्ष

आमिरची लेक इरा 3 जानेवारी 2024 रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
Published on

 Ira Khan Wedding Invitation: आमिर खानची मुलगी इरा खान ही सध्या तिच्या लग्नामुळे चर्तेत आहे. इरानं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत गेल्या वर्षी एंगेजमेंट केली होती. आता ती नुपूरसोबत जानेवारी 2024 मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.

सध्या इरा आणि नुपूर लग्नापुर्वीचे विधी करत आहेत. काही दिवसांपुर्वी इराच्या केळवणाचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारी व्यस्त आहेत.

Aamir Khan's daughter Ira wedding with Nupur Shikhare  sends puzzles to invite friends video viral
Bobby Deol : 'घरच्यांना कुठं माहिती होतं, मी 'आश्रम' च्या शुटींगला जातोय'! बॉबीनं सांगितलं मोठं सिक्रेट

आता इरा खान लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे आणि तिने आता तिच्या लग्नाची पत्रिका पाठवण्यास सुरुवात केली आहे. इराने तिच्या मैत्रिणींना पाठवलेल्या लग्नाच्या कार्डावरील प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत.

इरा खान-नुपूरच्या लग्नाला थोडेच दिवस शिल्लक आहेत. त्यात इरा खान-नुपूर यांनी मित्रांना लग्नाची पत्रिका पाठवण्यास सुरुवात केली आहे. आता सध्या या दोघांच्या लग्न पत्रिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Aamir Khan's daughter Ira wedding with Nupur Shikhare  sends puzzles to invite friends video viral
Abhijeet Bhattacharya : 'सलमान तर माझ्या रागालाही पात्र नाही'! भाईजानवर प्रसिद्ध गायकाची सणसणीत टीका

इरा खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या लग्नाच्या पत्रिकेची झलक पाहायला मिळत आहे. इरा खान-नूपूर शिखरेची लग्नपत्रिका पाहून चाहतेही थोडे चक्रावले आहेत.

इरा खान-नुपूर शिखरे यांनी आपल्या मित्रांना अनोख्या शैलीत लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवली आहेत. या लग्नपत्रिकेत एक कोडे पाठवले जे त्यांना कॅमेऱ्यासमोर सोडवायचे आहे. व्हिडिओ शेअर करत इराने एक लांबलचक नोटही लिहिली आहे.

Aamir Khan's daughter Ira wedding with Nupur Shikhare  sends puzzles to invite friends video viral
Manoj Bajpayee : 'तू कोणत्या राजकीय पक्षात जाणार', 'फॅमिली मॅन' चा श्रीकांतनं काय बोलून गेला?

आमिरची लेक इरा 3 जानेवारी 2024 रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आमिरने सांगितले होते की तिने 3 जानेवारी ही तिच्या लग्नाची तारीख निवडली कारण ती या तारखेला नुपूरसोबत डेटवर गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com