
आमीर खानने त्याच्या आगामी 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमाच्या शूटींगसाठी तो तुर्कीला पोहोचला आहे. तिथे पोहोचल्यावर सोशल डिस्टंन्सिंगची एैशीतैशी करत त्याच्या चाहत्यांनी आमीरला घेराव घातला.
मुंबई- लॉकडाऊन नंतर हळूहळू आता परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. त्यातंच नियमांचं पालत करत अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ४ महिन्यांनंतर मनोरंजनविश्वातील शूटींगला देखील सुरुवात झाली असून अनेक मालिका आणि रिऍलीटी शोचे नवीन एपिसोड दिसायला सुरुवात झाली आहे. सिनेमांची शूटींग मात्र देशाच्या बाहेर करण्यालाच सेलिब्रिटी प्राधान्य देतआहेत. अक्षय कुमारनंतर 'बेलबॉटम' सिनेमाची टीम युकेला रवाना झाल्यानंतर आता आमीर खान देखील शूटींगसाठी तुर्कीला पोहोचला आहे.
हे ही वाचा: सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि मॅनेजर श्रुतीला केलेला 'तो' मेसेज आला समोर
आमीर खानने कोरोनाच्या काळात शूटींगला सुरुवात केली आहे. त्याच्या आगामी 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमाच्या शूटींगसाठी तो तुर्कीला पोहोचला आहे. तिथे पोहोचल्यावर सोशल डिस्टंन्सिंगची एैशीतैशी करत त्याच्या चाहत्यांनी आमीरला घेराव घातला. यावेळी आमीर खान टेन्शनमध्ये दिसून आला.
आमीर खान कोरोनाच्या या काळात शूटींगवर ब-याच काळाने परतला आहे. तुर्कीमध्ये तो 'लाल सिंह चढ्ढा'ची शूटींग करत आहे. हा सिनेमा 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचा ऑफिशअल हिंदी रिमेक आहे. कोरोना व्हायरस पसरल्यानंतर सिनेइंडस्ट्रीमधील सगळंच शूटींग थांबलं आहे. आमीर खानचा 'लाल सिंह चढ्ढा' देखील या सिनेमांमध्ये सामील आहे. आमीरने या सिनेमाचं शूटींग आता सुरु केलं आहे. आमीरचे तुर्कीमधील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.
ACE Aamir Khan has reached Turkey to RESUME shoot of his upcoming mega Blockbuster Laal Singh Chaddha.
RT If You are excited
19 YEARS OF DIL CHAHTA HAI pic.twitter.com/vpUbDg1oOn— Laal Singh Chaddha (@ACEOFHINDOSTAN) August 9, 2020
यातील काही व्हिडिओमध्ये आमीरला त्याच्या चाहत्यांनी घेरलेलं दिसून येतंय. चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसून येतायेत.मात्र आमीरच्या चाहत्यांनी त्याला घेराव घातल्याने आमीरचं टेन्शन वाढलेलं दिसून आलं. आमीरला पाहताच त्याच्या चाहत्यांनी सोशल डिस्टंन्सिंग न पाहता सरळ त्याला घेरावंच घातला. या सिनेमामध्ये आमीरसोबत करिना कपूर देखील आहे.
aamir khans fans in turkey ask for selfie during lal singh chaddha shooting