अमिरचा 'लालसिंह चढ्ढा' पुढील वर्षी डिसेंबरमध्ये येणार; नक्की कशावर आधारीत आहे हा चित्रपट, वाचा

संतोष भिंगार्डे
Monday, 10 August 2020

आता या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होऊन अभिनेता आमिर खान पुन्हा सेटवर परतला आहे. 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटाचे शूटिंगसाठी आमिर नुकताच तुर्कीला रवाना झाला आहे.

मुंबई ः  मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अभिनेता आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट बघत असतात. गेल्या वर्षी अर्थात आपल्या वाढदिवशी त्याने "लालसिंग चड्ढा" या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे अर्धे शूटिंगदेखील झाले होते. पण कोरोनामुळे या शूटिंगला ब्रेक लागला. आता या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होऊन अभिनेता आमिर खान पुन्हा सेटवर परतला आहे. 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटाचे शूटिंगसाठी आमिर नुकताच तुर्कीला रवाना झाला आहे. या सिनेमात करीना कपूर खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'लालसिंग चड्ढा' हा टॉम हॅन्क्सच्या 'फॉरेस्ट गम्प' या इंग्लिश चित्रपटावर आधारित आहे.

सेलिब्रेटी बाप्पा! मंगेशकर कुटूंबियांना विघ्नहर्त्यांच्या आगमनाची उत्सुकता...

आमिर खानचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तो विमानतळावर तसेच हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांसोबत मास्कसह आणि मास्कशिवाय पोज देताना दिसला. तुर्की विमानतळावर त्याचे फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि आता बातमी अशी आली आहे की हा चित्रपट पुढील वर्षी अर्थात २०२१ मध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होत आहे. खरे तर हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रीकरणच ठप्प झाल्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त रुग्णालयातून घरी परतला; चाहत्यांना दिली स्वतःहून 'ही' माहिती

'लालसिंग चड्ढा'मध्ये आमीर खानबरोबरच करिना कपूर, विजय सेठूपती आणि मोना सिंग देखील मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी चंदीगडमध्येही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. तसेच आमिरने कोलकाता, केरळ, जैसलमेर, गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्येही या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aamirs Lal Singh Chadha will come out in December next year; Read exactly what this movie is based on