Aani Kay Hava Season 3 : जुई-साकेतचे पुन्हा त्याच ऊर्जेने पुनरागमन

जुई आणि साकेतच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली असून त्यांचे नाते आता अधिकच प्रगल्भ झाले आहे.
Aani Kay Hava Season 3
Aani Kay Hava Season 3sakal

मुंबई : एकच व्यक्तिरेखा तीन सिझनमध्ये साकारणे, तेसुद्धा त्या व्यक्तिरेखेचे सातत्य ठेवत आणि तेही दोन-अडीच वर्षांच्या अंतराने म्हणजे एखाद्या कलाकारासाठी हे तसे कठीणच काम आहे. मात्र हे आव्हान प्रिया बापट (priya bapat) व उमेश कामत (umesh kamat) यांनी लीलया पेलले आहे. बऱ्याच काळाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनमध्येही जुई आणि साकेतने पहिल्या दोन सीझनमधील ऊर्जा कायम ठेवली आहे. जुई आणि साकेतच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली असून त्यांचे नाते आता अधिकच प्रगल्भ झाले आहे. ते आता एकमेकांना पूर्ण ओळखत आहेत. या तिन्ही सिझनमध्ये एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे प्रिया आणि उमेशने ‘जुई’ आणि ‘साकेत’मधील सातत्य कायम ठेवले आहे. (Aani Kay Hava Season 3 Priya Bapat and Umesh Kamat to explore new phase of their relationship)

पहिल्या सिझनमध्ये ‘जुई’ आणि ‘साकेत’ या व्यक्तिरेखा नवीनच असल्याने प्रिया आणि उमेशला त्या पटकन आत्मसात करता आल्या आणि मुळात त्या थोड्याफार प्रमाणात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी मिळत्याजुळत्या असल्याने हे सहज शक्य झाले. प्रेक्षकांनीही त्यांना आपलेसे केले. त्यानंतर काही काळाच्या ब्रेकनंतर ‘आणि काय हवं’चा दुसरा सिझन आला. पुन्हा ‘जुई’ आणि ‘साकेत’शी एकरूप होताना प्रिया आणि उमेशला थोडी उजळणी करावी लागली. मात्र यातील सातत्य त्यांनी कायम राखले. कुठेही ‘जुई’ आणि ‘साकेत’ची व्यक्तिरेखा पूर्वीपेक्षा वेगळी भासली नाही. हे दोन्ही सिझन अडचणींशिवाय चित्रित झाल्याने प्रिया आणि उमेशला या व्यक्तिरेखेशी एकरूप होता आले. मात्र तिसऱ्या सिझनला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एक तर लॉकडाऊन असल्याने अनेक निर्बंध होते. त्यात प्रिया-उमेशचे इतर प्रोजेक्टही सुरु होते. आणखी भर म्हणजे ‘आणि काय हवं’च्या शूटिंगदरम्यान प्रिया, उमेश आणि दिग्दर्शक वरूण नार्वेकर या तिघांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे शूटिंग रद्द करावे लागले. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होताना अनेक अडचणी येत होत्या. कोरोनामुळे सिझन तीनचे चित्रीकरण तीन शेड्युलमध्ये पार पडले. तरीही त्यावर मात करत प्रिया आणि उमेशने ‘जुई’ आणि ‘साकेत’ पुन्हा त्याच ऊर्जेने आपल्यासमोर आणले आहेत.

Aani Kay Hava Season 3
पुणे महापालिका 11 गावांच्या ड्रेनेजसाठी खर्च करणार 392 कोटी

‘आणि काय हवं-३’ च्या शूटिंगबद्दल उमेश म्हणतो, ‘‘शूटिंगच्या शेड्यूलमध्ये कोरोनामुळे खंड पडत होता. त्यामुळे प्रत्येक वेळी भूमिकेशी एकरूप होताना थोडे कठीण होत होते. परंतु वरुणसारखा दिग्दर्शक सोबत असल्याने ते सोपे झाले. वरुणसोबत असल्यामुळे साकेत साकारणे सहज शक्य झाले.’’ तर प्रिया बापट म्हणते, ‘‘शूटिंगदरम्यान आम्ही तिघेही कोरोना पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे अर्थातच शूटिंग थांबवावे लागले. जुई ही बरीचशी माझ्या जवळ जाणारी असली तरी वरुणला अपेक्षित जुई शोधताना थोडा वेळ लागत होता. पहिले दोन सिझन केल्यामुळे जुई तितकीशी नवीन नव्हती आणि वरुण सोबत असल्यामुळे प्रत्येक वेळी तिला शोधणे तितके अवघड गेले नाही.’’

Aani Kay Hava Season 3
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे स्वबळ

एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशनचे ‘आणि काय हवं ३’ चे सहा भाग आपल्याला एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येतील. एमएक्स प्लेअर नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी असा दर्जेदार कन्टेन्ट घेऊन येत आहे. त्यापैकीच एक ‘आणि काय हवं’. ज्याचा आता तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com