
आराध्या बच्चन 'या' प्रसिद्ध कोरियन पॉप स्टारची कार्बन कॉपी!
ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai-Bachchan) आणि अभिषेक बच्चनची(Abhishek Bachchan) मुलगी आराध्या बच्चनचा(Aaradhya Bachchan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शूट केलेला आहे. ज्या व्हिडीओमध्ये ती देशभक्तीपर गीत 'सारे जहां से अच्छा' आणि 'वंदे मातरम' या दोन गाण्यांवर परफॉर्म करताना ती दिसत आहे. तिच्या या दोन्ही गाण्यांवरच्या परफॉर्मन्सने तिने चाहत्यांचं मन मात्र जिंकलं आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिची प्रशंसा करताना दिसत आहेत. कोणी आराध्याच्या चेहऱ्यातील निरागसता आवडल्याचं म्हटलंय तर कोणी तिच्या दिसण्याची तुलना थेट सेलिब्रिटी पॉप स्टार लिसा ब्लॅकपिंक(लालिसा मनोबल) शी केली आहे.
आराध्याचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील तिच्या एका फॅनपेज वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आराध्याने सफेद कुर्ता,केशरी दुपट्टा परिधान केला आहे. त्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'मां तुझे सलाम' चं गाणं ऐकायला येत आहे. या व्हिडीओला आराध्याची आई ऐश्वर्या राय-बच्चननेही लाईक केलं आहे. आराध्याची हेअरस्टाईल आणि तिचा लूकची प्रशंसा करताना चाहत्यांनी तिची तुलना थेट कोरियन पॉप स्टार लिसाशी केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,''लिसाची कार्बन कॉपी''. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे,''आराध्याला एकदा तरी लिसाला भेटायला हवं.असं म्हणतात सात चेहरे जगात असतात ते एकसारखे दिसतात''.
लिसा ही ऑल-गर्ल-के-पॉप या ब्लॅकपिंक ग्रुपची सदस्य आहे. ती आपल्या पॉप गाण्यांसोबतच आपल्या लूकसाठीही चर्चेत असते. २०२१ मध्ये आलेलेा तिचा एक पॉप गाण्यांचा अल्बम खूप हीट झाला होता. दक्षिण कोरियामध्ये लिसाचे असंख्य चाहते आहेत. तर एकीकडे आराध्या बच्चनही स्टारकीड्स म्हणून खूप प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत एअरपोर्टवर तिला तिच्या विचित्र चालण्याच्या स्टाईलवरून ट्रोल केलं गेलं होतं.
Web Title: Aardhya Bachchan Republic Day Video Virallook Like A Lisa Blackpink Corean Popstar Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..