Aaron Carter: बाथटबमध्ये जीव गेला! प्रसिद्ध गायकाचा 34 व्या वर्षीचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaron Carter

Aaron Carter: बाथटबमध्ये जीव गेला! प्रसिद्ध गायकाचा 34 व्या वर्षीचा मृत्यु

Aaron Carter american singer: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायक अॅरॉन कार्टरचा बाथटबमध्ये बुडून मृत्यु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड नैराश्यात होता. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला आहे. नव्वदीच्या दशकांत अॅरॉननं आपल्या गायकीनं मोठ्या प्रमाणात चाहत्यांची पसंती मिळवली होती. त्याचा फॉलोअर्सही प्रचंड होता.

जगप्रसिद्ध गायकांमध्ये कार्टरचे नाव घेतले जाते. त्याची गायकी, अनोखी स्टाईल यामुळे तो लोकप्रिय होता. त्यामुळे कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात लोकप्रियता त्यानं मिळवली होती. त्याच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्टर हा नैराश्यात होता. तो पॉप आणि हिप पॉप संगीतासाठी लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे यावर्षी तो पाचव्यांदा रिहॅबमध्ये राहिला होता. काही झालं की नशापाणी करायचं यामुळे अकालीच त्याचे निधन झाल्याचे बोलले जात आहे.

२००० साली अमेरिकन रॅपर, गायक यामुळे अॅरॉन हा कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा होता. ज्या वेगानं तो संगीत क्षेत्रात चमकता तारा झाला त्याच वेगानं त्याच्या लाईमलाईटची चमक कमी होत गेल्याचे संगीत क्षेत्रातील समीक्षक सांगतात. मात्र काहीही असलं तरी त्याच्या टीन म्युझिकला नेटकऱ्यांची, संगीत चाहत्यांची मोठी लोकप्रियता मिळाली होती.

हेही वाचा: Gautami Patil: सांगलीची सुपारी गौतमीला महागात पडली?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना सकाळी अकरा वाजता एक फोन आला.त्यात एक व्यक्ती ही बाथटबमध्ये बुडून मेल्याचे सांगण्यात आले होते. पोलिस या घटनेचा अजुन तपास करत असून या घटनेमागे घातपात तर नाही ना याची खात्री पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Mallika Sherawat: 'मलमली तारुण्य माझे'!