Esha Gupta Fitness: ईशाला जीम करताना पाहिलं तर थकवा दूर होईलच शिवाय...|Aasharm 3 web series Actress Esha Gupta gym fitness | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Esha Gupta video viral

Esha Gupta Fitness: ईशाला जीम करताना पाहिलं तर थकवा दूर होईलच शिवाय...

Esha Gupta: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता ही नेहमीच तिच्या (Bollywood Actress) बोल्डनेससाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण प्रकाश झा दिग्दर्शित (Prakash Jha) झालेली आश्रम नावाची मालिका. या मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये ईशाला महत्वाची भूमिका मिळाली आहे. त्यामुळे तिच्या बोल्ड सीनवर (Aashram Web Serise) तिचे चाहते जाम खूश आहे. बऱ्याच दिवसानंतर ईशा वेगळ्या लूकमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. प्रकाश झा यांच्या आश्रम या वेबसीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

सध्या सोशल मीडियावर ईशा गुप्ताचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ईशा जीममध्ये व्यायाम करते आहे. तिच्या त्या व्हिडिओवर तिचे चाहते फिदा आहे. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सोशल मीडियावर तिच्या आगळ्या वेगळ्या लूक्ससाठी ओळखली जाते. यापूर्वी देखील तिनं ज्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे ते तिच्या बोल्डनेसमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहे. परफेक्ट फिगरचा अट्टाहास धरणाऱ्या ईशाच्या त्या वर्कआऊट व्हिडिओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटी त्यांच्या फिटेनस फ्रिकसाठी ओळखल्या जातात.

शिल्पा शेट्टी, कृष्णा शेट्टी, नोरा फतेही, मलायका अरोरा, सारा अली खान, सुश्मिता सेन, करिना कपूर, दिशा पटानी, क्रिती सेनन या अभिनेत्री सध्याच्या घडीला बॉ़लीवूडच्या फिटनेस फ्रीक म्हणून ओळखल्या जातात. चाहत्यांना फिटनेसचे महत्व समजावून सांगणे आणि जीममधील वर्कआऊटचे व्हिडिओ व्हायरल करणे यामुळे त्यांना सोशल मीडियावर मिळणारा फिडबॅक मोठा आहे.

हेही वाचा: Aashram 3: लाखो रुपये खर्च, सजला निराला बाबाचा 'आश्रम', सैफ अलीशी काय आहे कनेक्शन?

ईशा ही केवळ पथ्य पाळून डाएट करत नाही तर जीममध्ये मेहनत करते हे त्या व्हिडिओतून दिसून आले आहे. तिच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देऊन ईशाचे कौतूक केले आहे. त्या व्हिडिओमध्ये ईशा ट्रेडमिलवर धावताना दिसते आहे. ईशाच्या फिटनेसबाबत तिचे चाहते नेहमीच बोलत असतात. मात्र त्यामागे तिची मेहनत किती आहे हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे ईशानं व्हिडिओ शेयर करुन आपल्या फिटनेसचे सिक्रेट नेटकऱ्यांना शेयर केले आहे.

हेही वाचा: Viral Video: चक्क थिएटरच्या छतावर चढून केला शिल्पानं डान्स

Web Title: Aasharm 3 Web Series Actress Esha Gupta Gym Fitness Video Viral Social Media Users Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top