Aashram 3: बॉ़बी देओलची 4 थ्या सीझनसाठी खास अट, 'मला आता...'

ओटीटीवर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.
Aashram Web series bobby Deol
Aashram Web series bobby Deol esakal

OTT News: ओटीटीवर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. (Aashram Web serise) यापूर्वीच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. प्रख्यात अभिनेता बॉबी देओलनं त्यामध्ये मुख्य (Bobby Deol) भूमिका साकारली आहे. बाबाजी यांची भूमिका साकारताना बॉबी लाईमलाईटमध्ये आला आहे. सुरुवातीपासूनच आश्रम ही मालिका वादाच्या (Entertainment News) भोवऱ्यात सापडली होती. त्याला अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. हरियाणमध्ये जेव्हा या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचे शुटिंग सुरु होते तेव्हा त्यावेळी मालिकेचे दिग्दर्शक प्रकाश झा यांना मारहाण झाली होती. सत्यघटनेवर आधारित या मालिकेला भारतातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

तिसऱ्या सीझनमध्ये बाबाजींची भांडाफोड होऊन त्यांची रवानगी जेलमध्ये होणार असे दिसत असतानाच एक वेगळा ट्विस्ट मालिकेमध्ये आला. त्यामुळे चौथ्या सीझनमध्ये आश्रम मालिकेचा निकाल लागणार असे सांगितले जात आहे. असे असले तरी या मालिकेतील मुख्य अभिनेता बॉबी देओलनं चौथ्या सीझनच्या स्क्रिप्टमध्ये काही अटी घातल्या आहेत. याशिवाय त्यानं काही बदलही सुचवले आहेत. ते जर मान्य असतील तरच आपण त्या मालिकेच्या शेवटच्या सीझनमध्ये काम करु असे त्यानं म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर आश्रम मालिकेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या आहे. त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉबी देओलची.

चौथा सीझन केव्हा येणार याचं उत्तर बॉबी देओलनं दिलं आहे. मॅक्स प्लेयरवर सुरु असलेल्या या मालिकेला भारताबाहेरही मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. काशीपूरमधल्या बाबाजींनी प्रेक्षकांना जिंकुन घेतले आहे. त्यांची भोंदूगिरी आता लोकांसमोर आली असून त्यांना कोणती शिक्षा होणार, त्यांच्यावरील आरोप सिद्ध होणार की नाही असे वेगवेगळे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्याची उत्तरं आता चौथ्या सीझनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

Aashram Web series bobby Deol
Video : Sarsenapati Hambirrao हा मराठीतला सर्वात महागडा सिनेमा आहे असा प्रवीण तरडे यांचा दावा

उगाचच ओढाताण करुन स्टोरी लिहायची नाही. असे मी पटकथा लेखकाला सांगितले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा नीरस होतो. प्रेक्षक मोठ्या अपेक्षा घेऊन तुमची कलाकृती पाहतात. त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. अशावेळी त्यांना आपण निराश करणे चुकीचे आहे. बाबाजीचे व्यक्तिमत्व आणखी प्रभावी कसे करता येईल याचाही विचार लेखकांना करायला सांगितला आहे. ते माझ्यासाठी महत्वाचे आहे. मला आता प्रेक्षकांसमोर आणखी प्रभावीपणे यायला आवडेल. असेही बॉबीनं यावेळी सांगितले.

Aashram Web series bobby Deol
कसा आहे अक्षयचा 'सम्राट पृथ्वीराज'?काय म्हणतायत प्रेक्षक;वाचा Public Review

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com