esakal | 'आश्रम 2' मधील अभिनेत्रीचा खुलासा, ''अध्यात्मिक गुरुंनी माझ्यासोबत..''
sakal

बोलून बातमी शोधा

anupriya

अनुप्रियाने 'सेक्रेड गेम्स' आणि 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये देखील काम केलंय. नुकतीच अनुप्रियाची ‘आश्रम २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.

'आश्रम 2' मधील अभिनेत्रीचा खुलासा, ''अध्यात्मिक गुरुंनी माझ्यासोबत..''

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  आश्रम २ ही वेबसिरीज सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या वेबसिरीजमधील काही सीन्स असोत किंवा मग पात्र, यातील अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जातोय. मात्र आता ही वेबसिरीज पुन्हा एकदा चर्चेत आलीये ती यातील एका अभिनेत्रीमुळे.  ‘पद्मावत’, ‘टाइगर जिंदा है’ आणि ‘वॉर’ या सिनेमांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने एक मोठा खुलासा केला आहे. अनुप्रियाने 'सेक्रेड गेम्स' आणि 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये देखील काम केलंय. नुकतीच अनुप्रियाची ‘आश्रम २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानिमित्ताने तिने एका मुलाखतीमध्ये ती १८ वर्षांची असताना तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.  

हे ही वाचा: ‘कट्यार..’ सिनेमाला ५ वर्ष पूर्ण, ‘सुरांशी जुळलेलं नात आजही कायम' सुबोधची खास पोस्ट    

अभिनेत्री अनुप्रियाने इ-टाइम्सला दिलेल्या या मुलाखतीमध्ये तिने ती १८ वर्षांची असतानाचा तिच्यासोबत अध्यात्मिक गुरुंनी केलेल्या गैरवर्तनाचा अनुभव सांगितला आहे. ‘माझ्या कुटुंबीयांचा एका अध्यात्मिक गुरुंवर प्रचंड विश्वास होता. मी पण त्यांच्यावर हळूहळू विश्वास ठेवायला लागले होते. त्यांनी मला अनेक सल्ले दिले आणि मला ते पटले देखील’ असं अनुप्रियाने म्हटलंय.

पुढे ती म्हणाली, ‘त्यांनी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. मी तेव्हा १८ वर्षांची होते. मी त्यांना गैरफायदा घेऊ दिला नाही. तेव्हा मी घाबरले होते. सुदैवाने त्यांना फायदा घेण्याची संधी मी दिली नाही. मी तिथून निसटले होते. माझं मन मला सांगत होतं मी ते ऐकायला हवं होतं. पण तिथेही मनातल्या मनात माझं युद्ध सुरू होतं. आमच्या सुरुवातीच्या काही भेटीगाठीतून मला काही तरी चुकीचं घडत असल्याचं जाणवत होतं. मी स्वत:वरच शंका घेऊ लागले. कारण माझा त्यांच्यावर विश्वास होता आणि हे अशक्य असल्याचं मला वाटायचं’ असं खुलासा तिने केला आहे. तिच्या या मुलाखतीमुळे ही वेबसिरीज आणखीनंच चर्चेचा विषय बनली आहे. 

aashram 2 fame actress anupriya goenka reveals about when she faced molestation 
 

loading image
go to top