
सुबोध भावे,सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन अशा दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड भावला. नुकतीच या सिनेमाला ५ वर्ष पूर्ण झाली.
‘कट्यार..’ सिनेमाला ५ वर्ष पूर्ण, ‘सुरांशी जुळलेलं नातं आजही कायम' सुबोधची खास पोस्ट
मुंबई- मराठी रंगभूमीवरील अजरामर संगीत नाटक म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’. पाच वर्षांआधी या नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुबोध भावे,सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन अशा दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड भावला. नुकतीच या सिनेमाला ५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
व्हिडिओ: शकिरासारखी ठुमकताना दिसली अजय देवगणची लेक निसा, व्हिडिओची चर्चा
कट्यार काळजात घुसली या सिनेमातील अभिनयासाठी आणि दिग्दर्शनासाठी सुबोध भावेचं खुप कौतुक झालं त्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा एक वेगळा प्रयोग म्हणून खास आहे. या सिनेमाबद्दलच्या भावना व्यक्त करताना सुबोध सांगतो, “कट्यार प्रदर्शित होऊन ५ वर्ष झाली, या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत जो आनंद आम्हाला मिळाला तोच आनंद आज ५ वर्षानंतरही मिळत आहे. निरागस सुरांशी जुळलेलं नात आजही कायम आहे! कट्यार वर भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप प्रेम. त्या सर्व दिग्गजांना विनम्र अभिवादन ज्यांच्यामुळे ही कलाकृती जन्मली आणि माझ्या कट्यारच्या संघाचे ही आभार आणि खूप प्रेम कारण त्यांच्या शिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं” अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
सुबोध भावे दिग्दर्शित या सिनेमात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वरसारख्या कलाकारांची दमदार फौज होती. खास बाब म्हणजे 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या माध्यमातून शंकर महादेवन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तर सुबोधने दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच त्याचं नशीब आजमावलं.
subodh bhave pens a heartfelt note as his debut directorial katyar kaljat ghusali clocks 5 years
Web Title: Subodh Bhave Pens Heartfelt Note His Debut Directorial Katyar Kaljat Ghusali Clocks
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..