esakal | 25 हजार पगार मग हे राहणीमान कसं परवडतं? अस्तादचा नगरसेवकांना प्रश्न

बोलून बातमी शोधा

Aastad kale
25 हजार पगार मग हे राहणीमान कसं परवडतं? अस्तादचा नगरसेवकांना प्रश्न
sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मुंबई : नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा कलाकार म्हणजे अस्ताद काळे. त्याच्या अभिनयाने तो नेहमी प्रेक्षकांचे मन जिंकतो. काही दिवसांपूर्वी ‘चंद्र आहे साक्षीला’ या प्रसिध्द मराठी मालिकेमधून अस्ताद प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेतील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

अस्तादने नुकताच सोशल मीडियावरुन 'चला प्रश्न विचारुया' असा हॅशटॅग वापरुन मनातले काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. या हॅशटॅगमधून त्याला दैनंदीन जिवनात पडणारे प्रश्न तो नेटकऱ्यांना विचारतो. नुकताच त्याने नगरसेवकांच्या पगारावर प्रश्न या 'चला प्रश्न विचारुया' हॅशटॅगमधून विचारला आहे. आस्तादने त्याचा फोटो शेअर करून कॅप्शन दिले,‘आता महाराष्ट्रतील ए ग्रेड पालिकामधल्या ‘नगरसेवकां’ चा पगार हा फारफार तर 25 हजार इतका आहे.

ज्यात पुणे, मुंबई आणि नागपूर येतात. आता पुण्यात, मुंबईत मी खूप राहिलोय. 25 हाजार रूपयांमध्ये हे असं राहिणीमान नाही हो परवडत फोर्च्युनरचा हफ्ताच 30 हजार वगैरे असेल (जर द्यायचा असेल तर अर्थात)’ आस्तादला पोस्टला कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी अस्तादच्या प्रश्नाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी देखील आस्तादने सुरू केलेल्या 'चला प्रश्न विचारुया' हॅशटॅगमधून सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने ‘आपल्या देशाचं क्षेत्रफळ आणि या देशातली लोकसंख्या ही नेत्यांना रोज नव्याने कळत असावी. कारण, असुविधेबाबत नेहमी लोकसंख्येची कारणं दिली जातात.’ अशी पोस्ट केली होती. अस्तादच्या या सोशल मीडियावरील नव्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

नगरसेवकांना जे लोक साहेब म्हणतात अशा लोकांना देखील या पोस्टमधून अस्तादने सडेतोड सुनावले आहेत. नगरसेवकांना साहेब, सर म्हणणं तातडीने बंद करायला हवं असं यातल्या अनेक पोस्टमध्ये म्हटलं आहे