esakal | 'अरे हाड.. आम्ही प्रश्न विचारणार'; आस्ताद काळेचा सरकारवर हल्लाबोल

बोलून बातमी शोधा

aastad kale
'अरे हाड.. आम्ही प्रश्न विचारणार'; आस्ताद काळेचा सरकारवर हल्लाबोल
sakal_logo
By
स्वाती वेमूल

राज्यासह देशभरात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. रुग्णसंख्येत दर दिवसाला वाढ होत असताना आता वैद्यकिय सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या कठीण काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे तर काहींनी सरकारच्या आणि राजकारण्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. अभिनेता आस्ताद काळेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'आम्ही प्रश्न विचारणार, सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला,' असं लिहित त्याने सरकार आणि राजकारण्यांवर ताशेरे ओढले आहेत.

आस्ताद काळेची पोस्ट-

'प्रश्न विचारायचे आहेत. स्वत्व जपायचं आहे. कदाचित जीव गमवावा लागू शकतो. कारण, श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही. अरे हाड.. आम्ही प्रश्न विचारणार. सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला.. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार. नागडे राजकारणी...नागडं सरकार...निरोप घेतो,' अशी पोस्ट आस्तादने लिहिली.

हेही वाचा : "मला बुधवार पेठेत कधी पाहिलं"; शिवीगाळ करणाऱ्याचा मानसी नाईकने घेतला समाचार

आस्तादची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. आस्ताद नेहमीच स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो. चालू घडामोडींवर तो त्याची मतं बेधडकपणे मांडत असतो. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.