सलमान खान सिनेमात असल्यामुळे मला भिती वाटतेय मी ठरेन नेपोटिझमचा बळी आयुष शर्माने व्यक्त केली भिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan-Ayush Sharma
#SalmanKhan#AyushSharma#antim#Bollywood#Newrelease#

'मी पण ठरेन का नेपोटिझमचा बळी?'

sakal_logo
By
प्रणाली मोरे

बॉलीवूडसाठी 'नेपोटिझम' हा शब्द काही नवीन नाही. पण अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझम विरोधात जणू एक मोहिमच राबवली गेली. आणि मग सगळ्याच खानदानी बड्या स्टार्सचे धाबे काही काळापुरते का होईला दणाणले एवढं मात्र नक्की. या नेपोटिझमच्या मोहिमेमुळे बड्या स्टार्सच्या त्या दरम्यान अगदी ओटिटी वर प्रदर्शित झालेल्या सिनेमांनाही मोठा दणका बसला. या प्रहारातून उत्तम अभिनेत्री असलेली आलिया भटही सुटली नाही. 'सडक २' तिच्या नावावरही हवा तसा चालला नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता ब-याच दिवसांनी या नेपोटिझमची भिती अभिनेता आयुष शर्माने बोलून दाखवलीय.

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

अभिनेता आयुष शर्मा आता सलमान खान निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी 'अंतिम' या सिनेमात दिसणार आहे. येत्या २६ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमात सलमान खान पोलिस ऑफिसरची तर आयुष खान खलनायकाची भूमिका करीत आहे. पण आता सिनेमाच्या प्रदर्शना आधी आयुषला भिती वाटतेय ती नेपोटिझमच्या वादळाची. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने ही भिती बोलून दाखवली.

आयुष शर्मा म्हणाला, "सलमान माझ्या बायकोचा मोठा भाऊ आहेच पण त्यासोबतच बॉलीवूडमधील एक मोठं नाव. मात्र आता ह्या नावाचंच मला दडपण येतंय. कारण आजपर्यंत सोशल मीडियावर मला या कारणावरून ब-याचदा ट्रोल केलं गेलंय. 'अंतिम' सिनेमाच्या निमित्ताने नेपोटिझमचा सूर पुन्हा छेडला जाऊ नये आणि एका चांगल्या कलाकृतीसोबत आमची मेहनत वाया जाऊ नये असे मला वाटत होते. म्हणून जेव्हा सलमान 'अंतिम' सिनेमाच्या निर्मितीसोबत त्यामध्ये कामही करतोय हे जेव्हा मला कळंल तेव्हा मी त्याला सिनेमात काम नं करण्याविषयी विनवणी केली. आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांनाच त्याला सिनेमात काम नं करण्याविषयी मनधरणी करायला सांगितली. पण सलमाननं कोणाचंच ऐकलं नाही. उलट त्यानं माझीच समजूत काढली की असं काही होणार नाही. तू फक्त आपले शंभर टक्के दे. मेहनत कर. या सिनेमासाठी माझ्या फीटनेसवर मी घेतलेली मेहनत पाहून उलट त्यानं माझं कौतूक केलं. सिनेमात त्याच्यावर हात उगारतानाचे सीन करताना माझा अवघडलेपण पाहून उलट तो सीन कसा आणखी चांगला कर , ट्रोलिंग कसं फार मनावर घ्यायचं नाही,लक्ष आपल्या कामावर ठेवायचं अशा चार गोष्टी समजावून सांगायचा. आता लोकांनी आमची मेहनत पहावी,तिला यश द्यावं उगाच नेपोटिझमच्या नावाखाली एका चांगल्या कलाकृतीची मेहनत वाया जाऊ नं द्यावी हीच माझी इच्छा आहे"

बॉलीवूडमध्ये लव्हयात्रीपासून आपल्या करिअरला सुरूवात केलेल्या अभिनेता आयुष शर्माला अजूनही बॉलीवूडमध्ये हवा तसा सुर गवसलेला नाही. ब-यापैकी डान्स आणि लूक असण्यासोबतच आयुषवर वरदहस्त आहे तो बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानचा. आतापर्यंत सलमानने त्याच्यासाठी सिनेमाची निर्मिती केली होती,आता खु्दद सलमान त्याच्यासोबत काम करतोय तेव्हा फक्त पहायचं ही 'जीजा-साले' की जोडी बॉक्सऑफिसवर काय कमाल करतेय. आयुषची गाडी रुळाला लागतेय की आयुषही 'नेपोटिझम'च्या दबावाखाली भरडला जातोय.

loading image
go to top