मितालीनंतर अभिज्ञाच्या लग्नाचा टीझर व्हायरल; पहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून अभिज्ञा भावे नेहमीच दिसत असते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अभिज्ञाचा साखरपुडा झाला. त्यानंतर नव्या वर्षात ६ जानेवारीला अभिज्ञाचा मेहूल पै सोबत शाही विवाह सोहळा पार पडला.

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून अभिज्ञा भावे नेहमीच दिसत असते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अभिज्ञाचा साखरपुडा झाला. त्यानंतर नव्या वर्षात ६ जानेवारीला अभिज्ञाचा मेहूल पै सोबत शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला संजय मोने, मयुरी देशमुख, शर्वरी लोहकरे, ओमप्रकाश शिंदे, श्रेया बुगडे, तेजस्वीनी पंडीत याच्यासह इतर कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्न सोहळ्याचे फोटो अभिज्ञा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले होते. त्या फोटोंना नेटकऱ्यांची खूप पसंती मिळाली. त्यानंतर अभिज्ञाने तिचे आणि मेहूलचे कपल फोटोशूटचे फोटो पोस्ट केले होते.

लग्नाच्या व्हिडिओचा टीझर तयार करायचा नवा ट्रेंण्ड आहे. सध्या सगळेच सेलिब्रिटी फोलो करत आहेत. काही दिवसांपूर्वी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाचा टीझर नुकताच व्हायरल झाला. मितालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्यानंतर आता अभिज्ञाने तिच्या लग्नाचा टीझर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी खूप पसंती दिली आहे. या व्हिडिओत अभिज्ञा आणि मेहूलच्या विवाह सोहळ्याचे काही खास क्षण दाखवले आहेत. लग्नाच्या तयारीपासून ते लग्नाचे विधी होईपर्यंतचे सर्व कार्यक्रम या  व्हिडिओमध्ये आहेत.

अभिज्ञा आणि मेहूल या व्हिडियोमध्ये खूप आनंदी दिसत आहेत. विवाह सोहळासाठी अभिज्ञाने पर्पल- गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी नेसली होती. तर मेहुलने अभिज्ञाला मॅाचिंग रंग घातला होता. दोघांची जोडी या व्हिडिओमध्ये छान दिसत आहे.

अभिज्ञाने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, ‘6 जानेवारी 2021, माझ्या आयुष्यातील काही आनंदाचे, भावनिक आणि खास क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडीओला 'रंग माळीयेला' या गाण्याचे पार्श्वसंगीत दिले आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार’या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhidnya bhave marriage teaser video viral