
अभिज्ञा भावेचा 'सुपरकूल डान्स'; व्हिडीओ एकदा पाहाच!
खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारून अभिनेत्री अभिज्ञा भावे घराघरात पोहोचली. अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञाने मिळून 'तेजाज्ञा' हा फॅशन ब्रँड लाँच केला. आता यासोबतच अभिज्ञाची आणखी एक कला चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. अभिनयासोबतच तिला डान्सचीही आवड असून अभिज्ञाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असलेल्या 'वन डान्स' या गाण्यावर अभिज्ञाने 'सुपरकूल' डान्स केला असून तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना फारच आवडला आहे.
'वन डान्स' या गाण्यावर ठराविक स्टेप्स करत डान्स करण्याचा हा ट्रेंड आहे. अभिज्ञाने तेच स्टेप्स फॉलो करत हा डान्स केला आहे. 'तुला डान्स छान जमलाय', 'तुझी ही नवीन बाजू आम्हाला पाहायला मिळाली' असे कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा : 'म्हातारा झालास, रोमान्स करताना लाज नाही का वाटत' म्हणणाऱ्यांना सलमानचं उत्तर
अभिज्ञाने २०२१ या वर्षाच्या सुरुवातीला मेहुल पै याच्याशी लग्न केलं. अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न आहे. दुसऱ्या लग्नावरून सोशल मीडियावर अभिज्ञाला ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगला तिने पोस्ट लिहित सडेतोड उत्तर दिलं होतं.
Web Title: Abhidnya Bhave Supercool Dance On One Dance Song Trend Watch
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..