esakal | 'म्हातारा झालास, रोमान्स करताना लाज नाही का वाटत' म्हणणाऱ्यांना सलमानचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

'म्हातारा झालास, रोमान्स करताना लाज नाही का वाटत' म्हणणाऱ्यांना सलमानचं उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानच्या 'राधे' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या आणि अभिनेत्री दिशा पटानीच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा होत आहे. पडद्यावर कधीही किसिंग सीन न करणाऱ्या सलमानने आता 'राधे' या चित्रपटात दिशासोबत किसिंग सीन शूट केला, असंही म्हटलं जातंय. एकीकडे या सीनची चर्चा होत असताना दुसरीकडे त्याला ट्रोलसुद्धा केलं जातंय. 'म्हातारा झालास, रोमान्स करताना लाज नाही का वाटत', 'दिशा आणि तुझ्या वयात किती अंतर आहे' असे अनेक कमेंट्स सलमानच्या ट्रेलरवर आले. त्यावर आता सलमानने त्याच्याच अंदाजात ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

'जर मी या वयात अॅक्शन सीन करू शकतो तर मग रोमान्स का नाही', असा उलट प्रश्न सलमानने टीकाकारांना विचारला आहे. दिशा आणि त्याच्या वयातीय अंतरावरून प्रश्न विचारणाऱ्यांना सलमानने म्हटलं, "चित्रपटात दिशा माझ्या वयाची नाही तर मी तिच्या वयाचा दिसतोय, त्यामुळे पुन्हा मला असे प्रश्न विचारू नका."

हेही वाचा : अरुणा इराणी यांनी या कारणासाठी घेतला आई न होण्याचा निर्णय

चित्रपटातील सलमानच्या किसिंग सीनबद्दल खुलासा करणारा एक व्हिडीओ दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम एकंदरीत शूटिंगच्या प्रवासाबद्दल सांगत आहे. त्यावेळी सलमान म्हणतो, "चित्रपटात माझा दिशासोबत किसिंग सीन दाखवला आहे. पण मी दिशाला किस केलं नाही. त्या सीनसाठी सेलोटेपचा वापर करण्यात आला आहे. मी सेलोटेपवर किस केलं."

loading image