
Big boss: बिचुकलेचं करण कुंद्राला हिणवणारं ट्वीट चर्चेत;नेटकरी संतापले
'बिग बॉस १५' चा स्पर्धक राहिलेला अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale) कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमी वादात पडत असतो किंवा चर्चेत रहायचा मुद्दामहून प्रयत्न करीत असतो. बिग बॉसच्या घरात असतानाही तो काही बाही बरळायचा अन् मग सलमानचे(Salman Khan) शाब्दिक फटके खायचा. देवोलिना भट्टाचार्जी ते शमिता शेट्टी पर्यंत घरातील अनेक महिला सदस्यांबाबत अर्वाच्य भाषेत बोलल्यामुळे त्याचं नेहमीच कोणाशीतरी भांडण व्हायचं. घराच्या बाहेर आल्यानंतर देखील तो नको ते बरळत सुटला. पण तो जे काही बोलल ते लोकांना ना पटलं,ना आवडलं. आता परत तो म्हणे करण कुंद्राविरोधात बेतालपणे काहीतरी बोलत सुटला आहे.
अभिजित बिचुकलेनं म्हणे करण कुंद्राला चक्क 'बेरोजगार' म्हटलं आहे. त्यानं करण कुंद्राच्या विरोधात एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे,''प्रतीक,शमिता,तेजस्वी,उमर सगळे चांगले कलाकार आता त्यांच्या कामात व्यस्त झाले आहेत. करण,तु माझ्या कंदी पेढ्याची जाहिरात कर,मी तुला १५० रुपये देईन''. अभिजित बिचुकलेच्या या ट्वीटवर करण कुंद्राच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. खरंतर हे काही पहिल्यांदा होत नाही की अभिजित बिचुकलेनं घरातल्या कोणत्या सदस्यावर निशाणा साधला आहे. याआधी नेहा भसीन आणि बिग बॉस विनर तेजस्वी विरोधातही ट्वीट करुन त्यानं चर्चेत रहायचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा: भीतीदायक! 'युक्रेन'साठी प्रियंका चोप्राची भावुक पोस्ट,मदतीचं आवाहन
करण कुंद्राने अभिजितच्या या ट्वीटला कोणतंच उत्तर दिलं नाही. पण त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याच्या बाजूने बोलताना अभिजितला धारेवर धरलं. एका करणच्या चाहत्यानं म्हटलं आहे,'शमिता कुठे बिझी आहे आणि करण कुंद्राचा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाल्यानंतर तू पुन्हा बोल आणि जर तुला वाटतं की करणकडे पैसा नाही तर या गोड गैरसमजुतीत तू खूश रहा'. तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे,'१५० च्या पुढे करोड लिहायला विसरलास का'. तर एकानं लिहिलंय,'करण तुला दादा म्हणतो,तू असं त्या नात्याचा सन्मान करतोस.करणकडे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत,ते प्रदर्शित होतील तेव्हा तुझ्या बिझी माणसांच्या लिस्टमध्ये तुला करणचं नाव लिहावं लागेल'.
हेही वाचा: Russia-Ukraine War:'लोकं मरतायत,तु हसतोयस';अर्शदच्या मीमवर नेटकरी नाराज
अभिजित बिचुकले 'बिग बॉस १५' मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री च्या माध्यमातुन आला होता. हिंदी बिग बॉस आधी त्यानं मराठी बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. मराठीत प्रसिद्ध झाल्यावर त्याला हिंदीकडून ऑफर आली होती. तर करण लवकरच सिंगर अकासा सिंहसोबत म्युझिक व्हिडीओत दिसणार आहे. त्यासोबतच करण गर्लफ्रेंड तेजस्वीसोबतही म्युझिक व्हिडीओ करत आहे.
Web Title: Abhijit Bichukale Tweet On Karan Kundrakarans Fans Angry On
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..