
Russia-Ukraine War:'लोकं मरतायत,तु हसतोयस';अर्शदच्या मीमवर नेटकरी नाराज
रशिया-युक्रेन(Russia-Ukraine War) युद्धाचे पडसाद आता जगभर उमटत चालले आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी पर्यंत साऱ्यांनीच या युद्धजन्य परिस्थितीवर चिंता,दुःख व्यक्त केलं आहे. प्रियंका चोप्रा,सोनू सूद पासून साऱ्या सेलिब्रिटींनी युक्रेनसाठी,तिथे फसलेल्या भारतीय नागरिकांसाठी लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे. पण असं सगळं सुरु असताना विनोदी अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्शद वारसीनं मात्र रशिया-युक्रेनमधील युद्धावर मीम केल्याचं दिसून आलं आहे. त्यानं त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर हे मीम शेअर केलं आहे. पण यामुळे नेटकरी मात्र त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत. त्याला 'अंसवेदनशील' माणूस म्हणून हिणवलं आहे. तर कुणी म्हटलं आहे 'हे घृणास्पद आहे'. 'लोकं मरत आहेत आणि तू हसत आहेस', असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला शाब्दिक फटके मारले आहे. नेमकं काय मीम केलंय अर्शद वारसीनं की त्याला नेटकऱ्यांनी असं धारेवर धरलं आहे. जाणून घेऊया सविस्तर
बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीनं ट्वीटरवर आपल्या 'गोलमाल' या सिनेमाच्या धर्तीवर हे मीम केले आहे. त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्याच्यासोबत अजय देवगण,शर्मन जोशी,रिमी सेन दिसत आहेत आणि त्यानं त्या प्रत्येकाला एक नाव टॅग केलंय त्यात अमेरिका,रशिया,युक्रेन आणि युक्रेनमधील बंडखोऱ्यांनी ताब्यात घेतलेला भाग यांचा समावेश आहे. त्या मीमला कॅप्शन देताना त्यानं लिहिलंय,''स्पष्टिकरण..गोलमाल या वेळेपेक्षा अधिक पुढे होता तर''. अर्थात सिनेमा आपण पाहिला असेल तर इतक्यात आपल्या लक्षात आलं असेलच काय करीत हा प्रताप केला असेल तो. नेटकरी भडकल्यावर त्यानं ते मीम ट्वीटरवरनं लगेच डीलीट केल्याचं कळतंय.

Arshad Warsi, Ajay Devgan,Sharman Joshi In 'Golmaal'
ट्वीटरवर लोकांनी या मीम वरनं हसण्यापेक्षा अर्शदला सुनावणं अधिक पसंत केलेलं दिसतंय. त्याला 'भावनाशून्य' म्हणत लोकांनी त्याला वैचारिक पातळीवर शिक्षित होण्याची तुला गरज आहे असंही खडसावलं आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलंय,'लोकं मरत असताना तु तुझ्या सिनेमातील दृश्यांना त्या युद्धाशी जोडून अशा पद्धतीनं त्याचं प्रदर्शन करायला नको हवं होतं. हे खूपच घृणास्पद आहे'. 'दुसरे मरतायत आपल्याला काय त्याचं ही भावना खूप वाईट आहे', असंही एका नेटकऱ्याने त्याला प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे.
Web Title: Arshad Warsi Posts Meme On Russia Ukraine War Angry Netizens Say People Are Dying Youre
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..