आराध्या बच्चनचा ख्रिसमस डान्स तुफान व्हायरल...Aaradhya Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaradhya Bachchan

आराध्या बच्चनचा ख्रिसमस डान्स तुफान व्हायरल...

अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या बच्चन(Aishwarya Bachchan) यांची लाडकी कन्या आराध्या जसजशी मोठी होतेय तसतसे तिच्या अंगातील काही चांगले गुण आपल्या समोर येत आहेत. ती उत्तम स्टेज परफॉर्मर आहे याचं एक उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी तिच्या शाळेमध्ये तिनं केलेला एक अॅक्ट. नृत्यातून व्यक्त होणा-या आराध्याच्या फरफॉर्मन्सनं सर्वांनाच भारावून टाकलं होतं. तेव्हा पण तिनं आपल्या अॅक्टच्या माध्यमातून स्त्री दाक्षिण्य या विषयावर भाष्य केलं होतं. आताही आराध्याचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तिनं केवळ नृत्य नाही तर एक सामाजिक संदेश द्यायचाही प्रयत्न केलाय.

आराध्यानं हा डान्स ख्रिसमस सेलिब्रेशनच्या निमित्तानं केलाय. रेड ड्रेस घालून डोक्यावर ख्रिसमस कॅप परिधान केलेली आराध्या खूपच सुंदर दिसत आहे. तिनं ख्रिसमसच्या गाण्यावर डान्स करताना ख्रिसमस सेलिब्रेशनचं,सांताक्लॉजचं महत्त्व पटवून सांगितलंय. तिनं सांगितलंय,''आपण प्रत्येकानं कोणाचं ना कोणाचं सांताक्लॉज बनायला हवं. केवळ दुसरा देईल याची अपेक्षा न ठेवता आपण द्यायलाही शिकलं पाहिजे. कोणाचं तरी सीक्रेट सांता बनायला केवळ ख्रिसमस ची वाट का पाहायची ? ज्याला गरज असेल तेव्हा आपण त्याचे सीक्रेट सांता का नाही बनत?'' असा प्रश्नही तिनं केलाय. या गाण्यावर नृत्य करताना तिनं हातात वाद्य घेऊन ते वाजवत नृत्याचा आनंद लुटलाय.

हेही वाचा: सिद्धार्थ चांदेकरला का काढाव्या लागल्यात 'उठा-बश्या'?

आराध्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मात्र तिचं भरभरून कौतूक केलंय. कुणी म्हटलंय,'खूप सुंदर दिसतेय'. तर कुणी म्हटलंय,'आईच्या पावलावर पाऊल ठेवलंय'. आता ऐश्वर्या आराध्याच्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आराध्याला ती कायम आपल्या सोबत ठेवते. तसंच तिच्या प्रत्येक गोष्टीत ती आवर्जुन लक्ष घालते. त्यामुळे आता आईच्या छायेखालीच वाढल्यावर लेक आईसारखी गुणवान होणारच नाही का.

Web Title: Abhishek Bachchan And Aishwarya Rais Daughter Aaradhya Sings Christmas Carols Dances Plays Drum In New Video Watch Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top