सिद्धार्थ चांदेकरला का काढाव्या लागल्यात 'उठा-बश्या'? Siddhartha Chandekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Chandekar

सिद्धार्थ चांदेकरला का काढाव्या लागल्यात 'उठा-बश्या'?

मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) हे मराठी इंडस्ट्रीतलं क्युट कपल आहे. ते दोघे नेहमीच एकमेकांसोबतचे अतरंगी व्हिडीओ शुट करून सोशल मीडियावर शेअर करीत असतात आणि लाखो चाहत्यांच्या पसंतीसही ते उतरतात. मग कधी दोघांनी एखादया डेस्टिनेशनला दिलेल्या भेटीचा ट्रॅव्हल व्हिडीओ असो की त्यांनी एखाद्या फॅमिली किंवा मित्र-परिवारातील एखादया सोहळ्यात लावलेली हजेरी असो किंवा मग त्यांच्या घरात चक्क पालीवरून घडलेलं महाभारत असो,दोघांच्या लुटूपुटूच्या रागातनं शूट केलेला व्हिडीओ असो...एक से एक एंटरटेनिंग विषय घेऊन हे दोघेही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत असतात.

हेही वाचा: जॅकी दादाने का केली मरण्याची गोष्ट?

आता पुन्हा सिद्धार्थची बायको अभिनेत्री मिताली मयेकरनं एक धम्माल व्हिडीओ शेअर केलेला आहे. काय घडलंय एवढं की मितालीनं कॅप्शन दिलंय,''पुन्हा या घरात तुला जेवायला मिळणार नाही.शेवटी मी बदला घेतला''. आता 'बदला' घेतला असं मिताली म्हणतेय ते का तर सांगतो आम्ही. त्यामागची कारणं अनेक आहेत. काही दिवसांपूर्वी घरात पाल आल्यामुळे मितालीची पळापळ अशीच कॅमे-यात बंदिस्त करून सिद्धार्थनं सोशल मीडियावर व्हायरल केली होती. जो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. तर आताच्या व्हिडीओत जे आपल्याला सिद्धार्थ नुडल्स खाताना दिसतोय ती त्यानं मितालीला आधी दिली होती ज्याची टेस्ट थोडी बिघडवली होती त्यानं मुद्दामहून. आणि स्वतःला मात्र परफेक्ट टेस्टी डिश बनवून आरामात खात बसला होता. तेव्हा उपाशी राहिलेल्या मितालीनं बदला घेत हा व्हिडीओ शूट केलाय. मग काय भुकेनं व्याकूळ सिद्धार्थ तिच्या मागे-मागे गेला खरंतर विनवण्या करत पण मितालीनं मात्र 'उठा-बश्या' काढायला लावल्या न त्याला. आता काय करणार बायकोची इच्छा म्हणत त्यानं जमत नव्हत्या तरी काढल्या कशा बशा त्या उठा-बश्या. अनं मितालीनं चक्क हेच शूट करून टाकलं सोशल मीडियावर.

'अग्निहोत्र' ही गाजलेली मालिका ते सुपरहीट 'झिम्मा' या सिनेमातनं दिसलेला दिलखुलास सिद्धार्थ नेहमीच प्रेक्षकांना त्याच्या भूमिकेच्या माध्यमातून पसंतीस उतरला आहे. तर 'उर्फी','बिल्लू','आम्ही बेफिकर' हे सिनेमे आणि 'लाडाची मी लेक ग' ही मालिका या कलाकृतींमधून मितालीनंही मराठी इंडस्ट्रीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. पण तसं पहायला गेलं तर मितालीला सोशल मीडियामुळे जास्त फेम मिळालं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता असे अतरंगी व्हिडीओ ती शेअर करणार तर फॉलोअर्स वाढणारच नाही का.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top