esakal | 'दसवी' मध्ये दिसणार अभिषेक, यामी; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood dasavi movie abhishek yami

अभिषेक सोबतच यामी गौतमने ही चित्रपटातील तिच्या भूमिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'दसवी' मध्ये दिसणार अभिषेक, यामी; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द  अभिनेता अभिषेक बच्चन नेहमीच वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफोर्मवर आलेल्या 'लूडो' या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभिषेकच्या 'दसवी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

अभिषेकने या चित्रपटातील त्याचा लूक सोशल मीडियावर रिव्हिल केला आहे. अभिषेकचा यामध्ये देसी लूक दिसत आहे. त्याने पोस्टर शेअर करून,' मीट गंगाराम चौधरी, शूट बिगींन्स' असे कॅप्शन अभिषेकने दिले आहे. चित्रपटाचे शूटिंग सूरू झाले असून गंगाराम चौधरी नावाची भूमिका अभिषेक करत आहे. त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. बॅबी देओल,ऋतिक रोशन, जोया अख्तर यांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. 

अभिषेक सोबतच यामी गौतमने ही चित्रपटातील तिच्या भूमिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटात तिने ज्योती देसवाल नावाच्या महिला  पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री निम्रत कौर देखील चित्रपटात दिसणार आहे. तिने बिमला देवीची भूमिका केली आहे.

'दसवी' चित्रपटाचे शूटिंग आग्रामध्ये होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तूषार जलोटा यांनी केली आहे. तर चित्रपटाची निर्मीती दिनेश विजन, संदीप लेजेल, शोभना यादव यांनी केली आहे. चित्रपटाचे शूटींग सुरू झाले असून आता चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.