कमी वेळात जास्त सिनेमे केल्याने झाली अक्षय कुमारची स्तुती, मात्र अभिषेक बच्चनला आला राग

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 17 December 2020

काहीजण व्हायरल ट्विट्स मजेत घेतात तर काही मात्र भडकतात. असंच काहीसं झालंय ते अभिनेता अभिषेक बच्चनच्या बाबतीत. अभिषेक सध्या त्याच्या एका ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. 

मुंबई- सोशल मिडियावर सध्या कोणाचं एकमेकांशी बिनसेल काही सांगता येत नाही. जेव्हा काही ट्विट्स व्हायरल होत असताता तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात. काहीजण व्हायरल ट्विट्स मजेत घेतात तर काही मात्र भडकतात. असंच काहीसं झालंय ते अभिनेता अभिषेक बच्चनच्या बाबतीत. अभिषेक सध्या त्याच्या एका ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. 

हे ही वाचा: धकधक गर्ल माधुरीने शेअर केला पती आणि मुलांसोबतचा 'फॅमजॅम' व्हिडीओ 

सिने दिग्दर्शक अक्षय राठीने सोशल मिडियावर नुकतंच एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी अक्षय कुमारची खूप स्तुती केली. त्यांना अक्षयचा शूटींग अंदाज खूपंच भावला. आणि म्हणूनंच त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं, 'ही किती सुंदर गोष्ट आहे की अभिनेता अक्षय कुमार काही वेळात एक सिनेमा करुन संपवतो तर काही कलाकार तेवढ्याच वेळात केवळ काही कौशल्य आत्मसात करतात. अक्षयचे सिनेमे देखील हिट होतात. इतर कलाकारांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. व्यवस्थित नियोजन करण्याची गरज आहे.'

अक्षय राठी यांच्या या ट्विटवर अभिषेक बच्चनने त्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या नजरेत कोणा एकाची स्तुती करणं हे चुकीचं नाहीये पण दुस-या कलाकारांना पाण्यात बघणं चुकीचं आहे. अभिषेकने अक्षयला उत्तर देत म्हटलं की, 'हे योग्य नाही. माणुस काम करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रोत्साहित होऊ शकतो. सगळ्यांचा काम करण्याचा एक स्वतःचा वेग असतो.' अभिषेकने त्यांचं मत मांडल्यानंतर हे ट्विटर वॉर इथेच थांबलं नाही तर अक्षयने अभिषेकला कोरोना काळातील आठवण करुन दिली की कशाप्रकारे सध्याच्या या कठीण परिस्थितीत जास्त सिनेमे रिलीज करण्याची गरज आहे.

त्याने म्हटलं की 'आता परिस्थिती पाहता कलाकारांनी त्यांचा वेग वाढवला पाहिजे' मात्र अभिषेकला काही ते पटलं नाही आणि तो म्हणाला की, 'कधीही जास्त सिनेमे केल्याने काहीही होत नाही तर चांगले सिनेमं करणं गरजेचं असतं.' तसंच त्याच्या म्हणण्याप्रमाणे जास्त सिनेमे केल्याने सिनइंडस्ट्रीचं नुकसानंच होईल कारण मग क्वालिटीमध्ये तडजोड केली जाईल.   

abhishek bachchan angry at akshay fan akshaye rathi tweets going viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan angry at akshay fan akshaye rathi tweets going viral