esakal | धकधक गर्ल माधुरीने शेअर केला पती आणि मुलांसोबतचा 'फॅमजॅम' व्हिडीओ

बोलून बातमी शोधा

madhuiri fam jam}

माधुरीने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ लॉकडाऊन दरम्यानचा असल्याचं तिने म्हटलंय. हा व्हिडिओ 'फॅमजॅम व्हिडिओ' म्हणून प्रसिद्ध होतोय. 

धकधक गर्ल माधुरीने शेअर केला पती आणि मुलांसोबतचा 'फॅमजॅम' व्हिडीओ
sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असते. माधुरी तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करताना दिसते. माधुरीने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ लॉकडाऊन दरम्यानचा असल्याचं तिने म्हटलंय. हा व्हिडिओ 'फॅमजॅम व्हिडिओ' म्हणून प्रसिद्ध होतोय. 

हे ही वाचा: 'देसी हॅरीपॉटर' सोशल मिडियावर व्हायरल, अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडिओ   

माधुरीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये माधुरी तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि तिची मुलं दिसत आहेत. व्हिडीओमध्ये माधुरी  सुरुवातीला गाणं गातेय. पती नेने हे गिटार वाजवत आहेत तर दुसरीकडे माधुरीचा मुलगा पियानो वाजवताना दिसतोय. लॉकडाऊनमध्ये जेव्हा आपण कोणी खाण्यापिण्यासाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर पडू शकत नव्हतो तेव्हा घरात संपूर्ण कुटुंब एकत्र असताना आपण काय करु शकतो असा विचार करताना ही कल्पना डोक्यात आल्याचं माधुरीने शेअर केलंय.

या व्हिडिओचा इंस्टावर एक टिझर शेअर करताना तिने म्हटलंय, “मला आशा आहे की तुम्हाला हा नक्की आवडेल”माधुरीचा आवाज या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ऐकायला मिळतोय. हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे आणि कशासाठी आहे याबद्दल तिने थोडक्यात माहिती दिली आहे. माधुरी म्हणते की, 'आज मी तुम्हाला लॉकडाऊनच्या काळातील माझ्या आयुष्यातील एक मजेदार भाग दाखवणार आहे. जेव्हा आपण लॉकडाउनमध्ये घरी बसलो आणि कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत होतो तेव्हा या काळात काय करायला पाहिजे? आम्ही बाहेर जाऊन खाऊ शकत नव्हतो किंवा सुट्टीच्या दिवशी कुठे जाऊ शकत नव्हतो. म्हणून घरीच काही गोष्टी मनोरंजक करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

याचा पूर्ण व्हिडिओ तिने तिच्या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे. घरात एकत्र असताना सगळ्यांच्या कला कशा बाहेर आल्या आहेत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.   

madhuri dixit shares sneak peek into her family that plays and stays together watch video