अभिषेक बच्चनला यूजरने विचारलं, 'ड्रग्स आहेत का?' ज्युनिअर बच्चनने उत्तर देत केली बोलती बंद

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 1 October 2020

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पदूकोणचं चॅट समोर आलं होतं ज्यात म्हटलं होतं माल है क्या? असाच काहीसा प्रकार एका यूजरने अभिषेक बच्चनसोबत केला आहे.

मुंबई-अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. एखादी पोस्ट त्याने सोशल मिडियावर शेअर केली की त्याचं यूजर्सच्या कमेंटवर चांगलंच लक्ष असतं. म्हणूनंच अनेकदा तो ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतो. आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चनवर असं करण्याची वेळ ट्रोलर्सनी आणली आहे. 

हे ही वाचा: राधे माँ 'बिग बॉस १४' मधील सगळ्यात जास्त मानधन घेणा-या स्पर्धक, एका आठवड्यासाठी मिळणार एवढे लाख रुपये  

सध्या बॉलीवूडमध्ये एकाच गोष्टीने खळबळ माजली आहे ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. बॉलीवूडमधील सेलिब्रिटींचं ड्रग कनेक्शन हा चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पदूकोणचं चॅट समोर आलं होतं ज्यात म्हटलं होतं माल है क्या? असाच काहीसा प्रकार एका यूजरने अभिषेक बच्चनसोबत केला आहे. या ट्रोलरने अभिषेकला विचारलं हॅश आहे का? यावर अभिषेकने मजेशीर अंदाजात उत्तर देत तिची बोलती बंदी केली आहे. 

अभिषेकने त्या ट्विटला रिट्विट करत म्हटलं, 'नाही. असं करु नकोस. मात्र मला तुझी मदत करण्यास आनंद होईल आणि तुला मुंबई पोलिसांसमोर न्यायला देखील. मला खात्री आहे की मुंबई पोलिसांना तुझ्या गरजा जाणून घेण्यास खूप आनंद होईल आणि तुला मदत करतील.' अभिषेक बच्चनने ट्रोलरला दिलेलं हे उत्तर चाहत्यांचं मन जिंकत आहे. 

अभिषेक बच्चनच्या या उत्तरानंतर ट्रोलरने लिहिलं, 'तुझा पीआर मला त्रास देत आहे. शेमलेस बच्चन.' यावरंही अभिषेकने उत्तर देत म्हटलं, 'मॅडम माझा कोणी पीआर नाही'.या चर्चेवर ज्युनिअर बच्चनला अनेकांनी सांगितलं की लोकांच्या अशा गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना महत्व देऊ नका.

तसं पाहायला गेलं तर अभिषेकसोबत हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही याआधी देखील अनेक गोष्टींवरुन त्याच्यावर निशाणा साधला गेला आहे. अभिषेकला कधी त्याच्या जॉबवरुन  तर कधी अभिनयावरुन ट्रोल केलं जातं. मात्र अभिषेक गप्प राहण्याऐवजी त्यांना सडेतोड उत्तरं देतो.   

abhishek bachchan asked drugs hai kya actor gave befitting reply to troller  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan asked drugs hai kya actor gave befitting reply to troller