राधे माँ 'बिग बॉस १४' मधील सगळ्यात जास्त मानधन घेणा-या स्पर्धक, एका आठवड्यासाठी मिळणार एवढे लाख रुपये

radhe ma
radhe ma

मुंबई- 'बिग बॉस १४' मध्ये यावेळी राधे माँ यांचा महिमा पाहायला मिळणार आहे. ख-या आयुष्यात राधे माँ कशा आहेत? बिग बॉसच्या कॅमेरांमध्ये राधे माँ यांचा कोणता अवतार टिपला जातोय? या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता तर राधे माँ यांच्या मानधनाविषयीची नवीन अपडेट समोर येतेय. राधे माँ 'बिग बॉस १४' च्या सगळ्यात जास्त मानधन घेणा-या स्पर्धक असल्याचं म्हटलं जातंय.

'बिग बॉस १४' च्या चाहत्यांसाठी राधे माँची एंट्री ही आश्चर्यचकित करणारी होती. राधे माँचा प्रोमो रिलीज झाल्यापासून आता त्यांच्याविषयी जाणून घेण्याची सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 'बिग बॉस १४' च्या स्पर्धकांपैकी राधे माँ सगळ्यात जास्त मानधन घेणा-या स्पर्धकांच्या यादीत सामील झाली आहे. राधे माँ यांना एका आठवड्याचे तब्बल २५ लाख रुपये मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये आता किती तथ्य आहे हे राधे माँ आणि निर्मात्यांनाच माहित. त्यांच्या मानधनाशी संबंधित कोणतीच अधिकृत माहिती अजुन समोर आलेली नाही. 

सोशल मिडियावर सध्या बिग बॉस आणि त्यात सहभागी होणा-या स्पर्धकांविषयी जोरदार चर्चा आहे.त्यातलंच एक चर्चेत असलेलं नाव म्हणजे राधे माँ. सोशल मिडियावर अनेकजण राधे माँ यांची खिल्ली उडवत आहेत तर काहीजण त्यांच्यावर जोक्स आणि मीम्स शेअर करत आहेत. असं म्हटलं जातंय की कित्येक वर्षांपासून राधे माँ यांना या शोमध्ये बोलवण्याचे निर्मात्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तेव्हा कुठे या सिझनला त्यांनी होकार दिला आहे.

पंजाबच्या गुरदासपुरशी संबंधित असलेल्या राधे माँ यांचे देशभरात अनेक भक्त आहेत. त्यांचे मुंबई आणि पंजाबमध्ये सत्संग होत असतात. कित्येक सेलिब्रिटींसोबत राधे माँ यांचे फोटो समोर आले आहेत. काही सेलिब्रिटी देखील त्यांचे भक्त आहेत.   

radhe maa among highest paid celebrity of bigg boss 14  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com