अखेर अभिषेक  बच्चनची कोरोना चाचणी निगेटिव्ह, लवकरच मिळणार डिस्चार्ज

संतोष भिंगार्डे
Saturday, 8 August 2020

आज अभिषेक बच्चनची कोरोना चाचणीनिगेटिव्ह आली आहे. एकोणतीस दिवसांनी आता तो घरी परतणार आहे. 

मुंबई :  बच्चन कुटुंबासाठी हा आठवडा आनंदाचा आहे. कारण अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन याचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आणि आता लवकरच तो आपल्या घरी परतेल. आज दुपारी अभिषेक बच्चन याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून, डॉक्टरांनी त्याला घरी जाण्यास संमती दिली आहे.

भरमसाठ बिले आकारणाऱ्या रुग्णालयांची पोलखोल; पनवेलमध्ये दर नियंत्रण प्राधिकरण अधिकाऱ्यांचे धाडसत्र

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना झाल्यामुळे 11 जुलै रोजी विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 27 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि ते 3 ऑगस्टला आपल्या घरी परतले. आज अभिषेक बच्चनची कोरोना चाचणीनिगेटिव्ह आली आहे. एकोणतीस दिवसांनी आता तो घरी परतणार आहे. 
 

 

अभिषेकने ही बातमी आपल्या ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांना सांगितली. त्याने हॉस्पिटलमधील त्याच्या केअर बोर्डाचे फोटो पोस्ट करत लिहिले, "आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तुम्ही सर्वांनी केलेली प्रार्थना व शुभेच्छा यांच्याबद्दल धन्यवाद. आता मला घरी जायला मिळणार याचा मला खूप आनंद झाला आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेतल्याबद्दल नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांचा मी कायमचा आभारी आहे. तुमच्याशिवाय आम्ही हे करू शकलो नसतो."
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan covid tests negative, he will discharge soon from hospital