Abhishek Bachchan: 'माधुरीनंतर तूच रे तूच खरा डान्सर..' नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिषेकचं भन्नाट उत्तर..

सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं अभिषेक बच्चनचे 'बोलबच्चन' सिनेमातील डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे.
Abhishek Bachchan
Abhishek BachchanInstagram

Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. मग ट्रोलर्सवर पलटवार करणं असो की चाहत्यांशी संवाद साधणं असो..त्याच्या ट्वीटमध्ये कमालीचा ह्युमर पहायला मिळतो. असाच ह्युमर पुन्हा एकदा पहायला मिळाला जेव्हा रणबीरच्या एका चाहत्यानं अभिषेकला तो माधुरी दिक्षितनंतर बेस्ट डान्सर आहे असं म्हटलं.

त्या नेटकऱ्याला त्यानंतर इतर नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. अनेक जणांनी इंडस्ट्रीतल्या काही इतर कलाकारांचा उल्लेख केला जे डान्समध्ये माहिर आहेत.

यामध्ये गोविंदा,हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ सारखे अॅक्टर्स आहेत. अर्थात अभिषेकनं नेटकऱ्याला मजेदार अंदाजात उत्तर दिलं ज्यानंतर त्याचे ते ट्वीट जोरदार व्हायरल झाले. (Abhishek Bachchan funny replied when user call him best dancer)

Abhishek Bachchan
Rakhi Sawant: करिअरचं सगळ्यात महागडं गाणं शूट करणार राखी सावंत..कोर्ट-कचेरी सोडून बया कामाला लागली..

नेटकऱ्यानं २०१२ मध्ये आलेल्या बोलबच्चन सिनेमातला डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक फनी व्हिडीओ आहे अभिषेक त्यात 'ऊ ला ला ला', 'जब तक है जान','मेरे ढोलना', 'हरा रंग डाला' सारख्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे.

नेटकऱ्यानं हे व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, ''माझ्यासाठी माधुरी दिक्षित नंतर तूच बेस्ट डान्सर आहेस..आय डोन्ट केअर. ''

आता यावर शांत बसेल तो अभिषेक कसला. त्यानं उत्तर देत म्हटलं,''कधी याच्यावरनं वादग्रस्त चर्चा झाली होती का?'' आणि पुढे त्यानं लाफिंग इमोजी शेअर केले आहेत.

एका नेटकऱ्यानं यावर रिप्लाय देत लिहिलं आहे की,'याला शूट करताना खूप मजा आली असेल. सिनेमातला बेस्ट पार्ट'.

तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'अभिषेकला नेहमीच नावं ठेवली जातात. पण मला त्याचं वेबसीरिज मधलं काम खूप आवडतं''.

आणखी एकानं लिहिलं आहे की,'केवळ अभिषेक बच्चनच हे करु शकतो'.

Abhishek Bachchan
Bollywood: बापाचे सिनेमे चालेनात पण पोरगा करणार बॉलीवूड डेब्यू?,सध्या काय करतोय 20 वर्षीय आरव अक्षय कुमार

माहितीसाठी सांगतो की 'बोलबच्चन' सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं होतं. सिनेमात अभिषेक बच्चन,अजय देवगण,प्राची देसाई,असिन,कृष्णा अभिषेक आणि अर्चना पूरणसिंग देखील होते.

अभिषेकचा सिनेमात डबल रोल होता. व्हायरल व्हिडीओमध्ये अभिषेकच्या व्यक्तिरेखेचं नाव अब्बास आहे,जो एक क्लासिकल कथ्थक डान्सर आहे.

तो सिनेमातील दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर जे अजय देवगणनं साकारलं आहे..पृथ्वीराज रघुवंशी त्याच्यासमोर आपलं टॅलेंट दाखवत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com