Abhishek Bachchan: अभिषेकवर चोरीचा आरोप! काय आहे प्रकरण?

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन हा त्याच्या हटक्या स्टाईलसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.
 Abhishek Bachchan
Abhishek Bachchan esakal

Tv Entertainment News: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन हा त्याच्या हटक्या स्टाईलसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. (Abhishek Bachchan) काही दिवसांपूर्वी त्याचा दसवी नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय त्यानं अनुराग बसूंच्या लुडोमध्ये साकारलेली भूमिका अनेकांच्या कौतूकाचा विषय होती. अभिषेक काही काळ का होईना लाईमलाईटमध्ये आल्याचे (Bollywood News) दिसून येत आहे. कान्समध्ये ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या सोबत तो दिसला होता. आता मात्र तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्यावर चक्क आरोप करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण?

रितेश देशमुखच्या केस तो बनता है या कार्यक्रमात अभिषेक बच्चन आला होता. (Bollywood celebrity news) त्यावेळी एक मोठा खुलासा समोर आला आहे. तो म्हणजे अभिषेकवर झालेला चोरीचा आरोप. विशेष म्हणजे ज्यावेळी त्याच्यावर चोरीचा आरोप झाला तेव्हा मात्र त्यानं चक्क पत्नी ऐश्वर्याचे नाव घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. अभिषेक हे काय बोलून गेला, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अभिषेक हा रितेशच्या त्या शोमध्ये येणार आहे. त्याचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. यावेळी अभिषेकनं आपल्या लवस्टोरी, आणि जुन्या चित्रपटांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

काही दिवसांपासून रितेशचा केस तो बनता है नावाचा शो चर्चेत आला आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चाही आहे. त्यात सेलिब्रेटींवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. सेलिब्रेटींनी त्या आरोपांचे पुरावे देऊन खंडन करणे अपेक्षित असते. यावेळी सहभागी झालेल्या अभिषेकवर फिल्म सेटवरील वेगवेगळ्या वस्तुंच्या चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर अभिषेकनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

 Abhishek Bachchan
Alia Bhatt: 'पुरुष पण आता बाळंत होणारेत!' आलिया पुन्हा बोलली

फिल्मसेटवरील सामान चोरुन ते घरी घेऊन जाण्याचा आरोप अभिषेकवर करण्यात आला. त्यावेळी रितेशनं त्याला विचारलं की, ही गोष्ट गुरुच्या सेटवरील आहे. तेव्हापासून अशा चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळी अभिषेक म्हणतो, मी बाकी कुणाची नाही तर ऐश्वर्याला चोरी केलं. आणि ट्रेलर त्याठिकाणी संपतो. अभिषेकनं दिलेलं गंमतीशीर उत्तर चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लवस्टोरीला सुरुवात त्या चित्रपटापासून झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यातील केमिस्ट्री ही गुरुपासून आणखी खुलल्याचे दिसून आले होते.

 Abhishek Bachchan
Kangana Ranaut: 'इंग्रजी येत नाही म्हणणाऱ्यांनो, मी आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनात!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com