'मी नव्हे तू देशद्रोही', अभिषेक- केकेआरमध्ये जुंपली|Abhishek Bachchan Kamal Rashid Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhishek Bachchan And KKR

'मी नव्हे तू देशद्रोही', अभिषेक- केकेआरमध्ये जुंपली

Bollywood Actors: केकेआर हा नेहमीच वादग्रस्त भूमिका घेताना (Bollywood News) दिसून येतो. बॉलीवूडच्या कित्येक सेलिब्रेटींशी त्यानं पंगा घेतला आहे. आताही त्यानं प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आहे. तो वाद टोकाला पोहचला असून त्यावर अभिषेकनं केकेआरला (KKR) जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांच्यातील व्टिटर वॉर हे सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यानं नेटकऱ्यंचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. कमाल खान हा स्वताला मोठा समीक्षक समजतो. यातून त्यानं अनेक चित्रपटांवर टीका केली होती. सलमान खानच्या अंतिमवरही कमाल खाननं सडकून टीका केली होती. ती टीका सलमानच्या एवढ्यी जिव्हारी लागली की त्यानं थेट कमाल खानच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

अभिषेक बच्चननं सोशल मीडियावर (Viral On Social Media) कमाल खानला चांगलेच सुनावले आहे. त्याचं झालं असं की, अभिषेक बच्चननं मल्याळम चित्रपट वाशीचं पोस्ट सोशल मीडियावरुन शेयर केलं होतं. त्यामध्ये तोविनो थॉमस आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. अभिषेकनं लिहिलं आहे की, मल्याळम चित्रपट विश्वातील सर्वात प्रभावी मुव्ही आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तोविना, कीर्ती यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. त्यावर कमाल खाननं अभिषेकला लक्ष्य करुन त्याच्यावर टीका केली. त्यानं लिहिलं आहे की, भाऊ तुम्ही कधी बॉलीवूडची देखील स्तुती करा.. एखादी चांगली कलाकृती तयार करा...

हेही वाचा: Viral Video : बुलेटस्वार मुलीचा स्टंटबाजी; नेटकरी म्हणाले...

यासगळ्यावर अभिषेकनं कमाल खानवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं कमाल खानला देशद्रोही म्हटलं आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करु. मी नव्हे तर आपण देशद्रोही आहात. तुम्ही तर एक देशद्रोही चित्रपट तयार केला होता. अभिषेकच्या या व्टिटवर नेटकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यावर पुन्हा कमाल खाननं अभिषेकला टोकलं असून माझ्या चित्रपटाचे बजेट हे तुमच्या मेकअप मॅनच्या मानधनाएवढेच आहे. त्यामुळे तुम्हीच ती जबाबारी घ्या. असंही त्यानं सुनावले आहे.

हेही वाचा: रावसाहेब दानवेंनी वडा पाव खाल्ला, पैसे दिले की नाही? बिलाच्या पावतीचा फोटो Viral

Web Title: Abhishek Bachchan Kamal Rashid Khan Social Media War Viral Deshdrohi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top