esakal | ‘बॉब बिस्वास' मधील हटके लूकमुळे अभिषेक बच्चनला ओळखणं मुश्किल, शूटींगचे फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

abhishek

अभिषेकचा नुकताच 'लुडो' हा सिनेमा देखील डिजीटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता लवकरच तो ‘बॉब बिस्वास’ या सिनेमात झळकणार असून या सिनेमाच्या शूटींग दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे.

‘बॉब बिस्वास' मधील हटके लूकमुळे अभिषेक बच्चनला ओळखणं मुश्किल, शूटींगचे फोटो व्हायरल

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सोशल मिडियावर ब-याचदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी सोशल मिडियावरच चर्चा आहे ती अभिषेक बच्चनच्या हटके लूकची. या लूकमध्ये अभिषेकला ओळखणं देखील मुश्किल आहे. अभिषेक बच्चन सध्या वेब सीरिज, सिनेमा अशा अनेक माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतीच त्याची ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता लवकरच तो ‘बॉब बिस्वास’ या सिनेमात झळकणार असून या सिनेमाच्या शूटींग दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा: '..यासाठी केली मोदींच्या वेबसिरीजची निर्मिती', विरोधकांच्या आरोपांवर दिग्दर्शक उमेश यांचं प्रत्युत्तर      

‘बॉब बिस्वास’ या सिनेमाचं कोलकाता मध्ये शूटींग सुरु असून या सेटवरचा अभिषेकचा फोटो इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घालतोय. हा फोटो अभिषेकच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. ९ डिसेंबरपर्यंत या सिनेमाचं शूटींग पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. अभिषेकच्या 'बॉब बिस्वास' सिनेमात चित्रांगदा सिंह महत्वाची भूमिका साकारणार आहे. या फोटोमधील अभिषेकचा लूक पाहता त्याला ओळखणं पहिल्याच नजरेत ओळखणं कठीण आहे. 

अभिषेकचा नुकताच 'लुडो' हा सिनेमा देखील डिजीटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोरोनाच्या संकटामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करता आला नाही त्यामुळे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला.

abhishek bachchan new character in bob biswas you will be surprised to see  

loading image