घराणेशाहीच्या वादात अभिषेकची उडी, ‘वडिलांसाठी मी सिनेमाची निर्मिती केली त्यांनी माझ्यासाठी नाही’

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 6 November 2020

अभिषेक हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. ट्रोलर्सच्या निशाण्यावर अनेकदा अभिषेक असतो.

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. घराणेशाहीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर तर स्टार किड्सवर जोरदार टीका होताना दिसली. त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता अभिषेक बच्चन याने उडी घेतली आहे. “माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सिनेमा तयार केला नाही, उलट मीच त्यांच्यासाठी सिनेमाची निर्मिती केली.” असं प्रत्युत्तर त्याने ट्रोलर्सना दिलं आहे.  

हे ही वाचा: अर्णब गोस्वामींना पाठिंबा देताय की भाजपाची फुकट जाहिरात करताय? कुणाल कामराने लगावला टोला    

अभिषेक हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. ट्रोलर्सच्या निशाण्यावर अनेकदा अभिषेक असतो. त्याचे वडील अमिताभ आहेत त्यामुळे त्याला सिनेमात काम करण्याची संधी मिळते, अशी टीका त्याच्यावर वारंवार केली जाते. मात्र या ट्रोलर्सना अभिषेकने देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी कधीही कोणाला फोन करुन माझ्यासाठी काम मागितलं नाही आणि ते मागणारही नाहीत. कारण बिग बी अत्यंत स्वावलंबी आहेत. मी देखील इतर कलाकारांप्रमाणे ऑडिशन देऊनच कामं मिळवली आहेत. त्यामुळे उगाच माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणं चुकीचं आहे.

स्टार किड्सला काम मिळवणं थोडं सोप असतं हे मी मान्य करतो. पण सिनेमा फ्लॉप झाला तर त्यांना देखील कोणी विचारत नाही. अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला मिळतील. सिने उद्योग हा एक व्यवसाय आहे. इथे नफा आणि तोटा याची गणितं चालतात. शिवाय माझ्या वडिलांनी कधीही माझ्यासाठी सिनेमा तयार केला नाही. पण मी त्यांच्यासाठी ‘पा’ या सिनेमाची निर्मिती केली होती.”

abhishek bachchan opens up on nepotism says his dad amitabh never made film for him  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan opens up on nepotism says his dad amitabh never made film for him