esakal | अभिषेकने सांगितला ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

बोलून बातमी शोधा

aishwarya abhishek
अभिषेकने सांगितला ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा
sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन. या दोघांच्या लग्नाला नुकतीच १४ वर्षे पूर्ण झाली. २००७ मध्ये अभिषेक-ऐश्वर्याने लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी या दोघांनी एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. एका मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. स्वित्झर्लंडमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होता आणि त्याला निमित्त ठरला होता अभिनेता बॉबी देओल. त्यावेळी ऐश्वर्या बॉबी देओलसोबत 'और प्यार हो गया' या चित्रपटाचं शूटिंग करत होती आणि अभिषेक एका दुसऱ्या चित्रपटाच्या रेकीसाठी तिथे गेला होता.

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये अभिषेकने सांगितलं, "मी प्रॉडक्शन बॉय असताना आमची पहिली भेट झाली होती. मृत्यूदाता या चित्रपटात माझे बाबा काम करत होते आणि मला त्याच्या रेकीसाठी स्वित्झर्लंडला पाठवण्यात आलं होतं. मी स्वित्झर्लंडमधल्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला होतो, त्यामुळे मला तिथली ठिकाणं चांगल्याप्रकारे माहित असतील, म्हणून रेकीसाठी पाठवण्यात आलं होतं. त्याचवेळी माझा बालमित्र बॉबी देओल तिथे शूटिंगसाठी आला होता. एकेदिवशी त्याने मला डिनरसाठी बोलावलं आणि त्याचवेळी माझी ऐश्वर्यासोबत पहिल्यांदा भेट झाली."

हेही वाचा : महाराष्ट्राबाहेर होणार मराठी मालिकांचं शूटिंग

पहिल्या भेटीतच अभिषेक ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. "तिला पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. ही गोष्ट तुम्हीसुद्धा मान्य कराल", असं तो म्हणाला. नंतर एकमेकांसोबत चित्रपटांमध्ये काम करत असताना दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. ऐश्वर्या-अभिषेकने 'गुरू', 'रावण', 'सरकार राज', 'उमराव जान', 'धूम २' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.