घराणेशाहीच्या मुद्द्यावर अभिषेक बच्चनने दिलेल्या अशा कमेंटने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या..

abhishek bachchan
abhishek bachchan
Updated on

मुंबई- बॉलीवूडमध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीच्या मुद्द्यावर पुन्हा उधाण आलंय. सुशांतने घराणेशाहीमुळे नैराश्यात असल्याने आत्महत्या केली असा आरोप सतत केला जातोय. या घराणेशाहीमुळे सुशांतला काम मिळालं नाही तसंच काही सेलिब्रेटींमुळे त्याच्या हातून काम काढून घेण्यात आलं त्यामुळे त्याने हे टोकांचं पाऊल उचलल्याची सगळीकडे चर्चा आहे. सुशांतच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलं नसलं तरी सोशल मिडियावर मात्र अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अनुभवाविषयी बोलते झाले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येवर अनेक स्टारकिड्सनी इंडस्ट्रीमधील आपले चांगले वाईट अनुभव सांगायला सुरुवात केली आहे. यातंच महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनच्या नावाचा देखील समावेश आहे. नुकताच अभिषेकने खुलासा केला आहे की सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा असून देखील त्याला त्याच्या करिअरमध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. 

अभिषेकने नुकताच खुलासा केला आहे की, '१९९८ मध्ये मी आणि राकेश ओम प्रकाश मेहरा आमच्या कारकिर्दिची सुरुवात एकत्र करणार होतो. मी त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणार होतो मात्र मला लॉन्च करण्यासाठी कोणी पुढे आलं नाही. यासाठी मी खूप प्रयत्न केलं. मला लक्षातंही नाही की कित्येक निर्माते आणि दिग्दर्शकांकडे फे-या मारल्या असतील.  मी कित्येक लोकांना सांगितलं की मला अभिनयाची एक संधी द्या. त्यानंतर आम्ही दोघांनी स्वतःच काहीतरी करण्याचा विचार केला आणि 'समझौता एक्सप्रेस'वर काम करायला सुरुवात केली. मात्र तो सिनेमा बनू शकला नाही.'

अभिषेकने पुढे लिहिलंय की, 'मोठ्या मुश्किलीने नंतर काम मिळालं. नशिबाने शेवटी जेपी साहेबांना माझा लूक आवडला. त्यांना माझ्यासोबत 'आखिरी मुगल' सिनेमा करायचा होता मात्र हा सिनेमाही बनू शकला नाही.' अभिषेकने नंतर 'रिफ्युजी' या सिनेमातून पदार्पण केलं.   

abhishek bachchan reveals he approached many directors and producers to give him a chance  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com