सोनमने शेअर केले चाहत्यांच्या हेट मेसेजचे स्क्रीनशॉट, कमेंट सेक्शनही केलं बंद

sonam
sonam

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदाल घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. सुशांतचे चाहते त्याच्या मृत्युचा राग बॉलीवूडमधील अशा सेलिब्रिटींवर काढत आहेत जे कुटुंब फिल्मी बँग्राऊंडचे आहेत. घराणेशाहीच्या या मुद्द्यावरुन अनिल कपूरची मुलगी अभिनेत्री सोनम कपूरला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. लोकांच्या या त्रासाला कंटाळून सोनमने तिच्या पोस्टवरिल कमेंट सेक्शनंच बंद ठेवलं आहे आणि सुशांतच्या चाहत्यांनी पाठवलेल्या तिरस्काराच्या मेसेजेचे स्क्रीनशॉट्स तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

 त्याचं झालं असं की सोनम कपूरने फादर्स डेच्या दिवशी एक ट्वीट पोस्ट केलं होतं. या ट्विटमुळे ती सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. सोनमने या ट्विटमध्ये असं लिहिलं होतं की, तिला या गोष्टीचा गर्व आहे की तिच्या वडिलांमुळे ती आज इथपर्यंत पोहोचू शकली. तिच्या या ट्विटमुळे लोकांना तिला केवळ ट्रोलंच केलं नाही तर तिला मेसेजेस करुन खूप काही ऐकवलं.

सोनमने या सगळ्या गोष्टींना वैतागुन सोशल मिडियावरिल तिच्या पोस्टचं कमेंट सेक्शनंच बंद ठेवलं आहे. सोनमने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहे की, होय मी माझं आणि माझ्या पालकांच्या सोशल साईट्सचं कमेंट सेक्शन बंद केलं आहे कारण मला नाही वाटत की माझ्या ६४ वर्षाच्या वृद्ध आई वडिलांनी हे सहन करावं. त्यांनी असं काहीच वाईट केलं नाही की त्यांनी लोकांची ही अशी बोलणी ऐकावी. आणि मी हे सगळं तुमच्यासारख्या मुर्खांना घाबरुन करत नाही आहे तर साध्या कॉमन सेन्समुळे करतेय ज्यामुळे मी माझी आणि माझ्या पालकांची मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवू शकते. 

या सगळ्या प्रकरणात सोनम कपूरने तिचं कमेंट सेक्शन बंद केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा, साकिब सलीम, जहीर इकबाल यांसारख्या कलाकारांनीही त्यांचं ट्विटर अकाऊंट डिऍक्टीवेट केलं आहे.     

sonam kapoor shares screenshots of hate messages on instagram  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com