'हॅप्पी न्यु ईयर' सिनेमाच्या आठवणीत अभिषेक म्हणाला, 'केवळ आम्ही एका रुममध्ये एकत्र झोपलो नाही'

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

सोशल मिडियावर अभिषेक बच्चन त्याच्या या दोन दशकांचा मोठा प्रवास सतत त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. यामध्ये तो त्याच्या सिनेमातील काही मजेशीर गोष्टी देखील शेअर करत आहे.

मुंबई- अभिनेता अभिषेक बच्चनला सिनेइंडस्ट्रीत काम करुन २० वर्ष पूर्ण झाली. सोशल मिडियावर अभिषेक बच्चन त्याच्या या दोन दशकांचा मोठा प्रवास सतत त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. यामध्ये तो त्याच्या सिनेमातील काही मजेशीर गोष्टी देखील शेअर करत आहे. नुकतंच अभिषेकने त्याच्या 'हॅप्पी न्यू ईयर' या सिनेमाच्या आठवणींमध्ये एक मोठी पोस्ट लिहिली आहे.

हे ही वाचा: श्रद्धा कपूर-सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'एक व्हिलन' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये लागली 'यांची' वर्णी

अभिषेकने 'हॅप्पी न्यू ईयर' या सिनेमाचं पोस्टर शेअर करताना लिहिलंय, 'एक सिनेमा ज्यामध्ये माझ्या काही आवडत्या व्यक्ती आहेत. फराहने मै हूं ना सिनेमानंतर लगेचच हॅप्पी न्यू ईयर या सिनेमाच्या कल्पनेविषयी मला सांगितलं होतं. तेव्हा काही जुळून  आलं नाही आणि मग तिने ओम शांती ओम सिनेमा बनवायला घेतला. मात्र जेव्हा फराहने हॅप्पी न्यू ईयर हा सिनेमा बनवायला घेतला तेव्हा तो सिनेमा साईन करणारा मी पहिला होतो.'

अभिषेकने या सिनेमाच्या शूटींगचे किस्से सांगताना लिहिलं आहे की, 'हा खरंच नावाप्रमाणे हॅप्पी सिनेमा होता आणि माझ्या आयुष्यातील आठवणीत राहणारा आणि सगळ्यात मजेशीर शूट असणारा सिनेमा होता. शाहरुख आणि फराह यांनी कधीच कोणत्या कलाकारांमध्ये भेदभाव केला नाही. आमची एक मोठी गँग होती. दुबईमधील सुंदर अटलांटिस हॉटेलमध्ये राहणं म्हणजे आम्हाला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासारखं होतं. आणि फराह तिकडची हेडमास्तर जी तिच्या मस्तीखोर मुलांना चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत होती. (आणि हो यात बमन ईरानी देखील सहभागी होते) मला कळालंच नाही की या सिनेमाचं शूटींग कधी सुरु झालं आणि संपलं देखील. ही खरंच एक हॅप्पी टीम आणि हॅप्पी सिनेमा होता.'

'या सिनेमाचा भाग असल्याने सगळेच कलाकार आनंदी होते. आम्ही दररोज एकत्र हसत होतो, एकत्र काम करत होतो, सोबत खेळत होतो, व्यायाम करत होतो, प्रवास करत होतो, खात होतो, प्रॅक्टीस करत होतो, बाहेर फिरायला आणि पार्टी करायला जात होतो. केवळ एकंच काम असं होते जे आम्ही एकत्र केलं नाही(देवाचे आभार) ते म्हणजे एकत्र एका रुममध्ये आम्ही झोपलो नाही. फराहला सकाळी लवकर उठायची अजिबात सवय नाही आहे. मला या सिनेमाचा एक भाग बनवल्याने मी शाहरुख आणि फराहचे आभार कधीच फेडू शकत नाही.'

abhishek bachchan says the only thing we did not do was sleep in the same room together  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan says the only thing we did not do was sleep in the same room together