श्रद्धा कपूर-सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'एक व्हिलन' सिनेमाला ६ वर्ष पूर्ण, सिक्वेलमध्ये लागली 'यांची' वर्णी

टीम ई सकाळ
Saturday, 27 June 2020

याच वर्षी मार्च महिन्यात सिनेमाच्या निर्मात्यांनी 'एक व्हिलन'चा सिक्वेल येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आणि सिनेमाचं नावंही 'एक व्हिलन २' असं असणार असल्याचं जाहीर केलं.

मुंबई- बॉलीवूडचा सुपरहिट सिनेमा 'एक व्हिलन'ला रिलीज होऊन ६ वर्ष पूर्ण झाली. हा सिनेमा २७ जून २०१४ ला रिलीज झाला होता. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला मिळालेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहून सिनेमाच्या निर्मात्यांनी याचा सिक्वेल बनवणार असल्याचं बोलून दाखवलं होतं. याच वर्षी मार्च महिन्यात सिनेमाच्या निर्मात्यांनी 'एक व्हिलन'चा सिक्वेल येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आणि सिनेमाचं नावंही 'एक व्हिलन २' असं असणार असल्याचं जाहीर केलं.

हे ही वाचा: शाहरुख खानने सुरु केली शूटींग? मन्नतच्या बाल्कनीमध्ये शूटींग करतानाचा व्हिडिओ व्हायरल

या सिनेमाच्या निर्मात्यांनी 'एक व्हिलन २' च्या स्टारकास्टची देखील घोषणा केली आहे. यामध्ये आदित्य रॉय कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत असणार असल्याचं सांगितलं जातंय. सिनेमाला ६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या सिनेमाचा  सिक्वेल का बनला पाहिजे आणि हा का पाहिला पाहिजे याची कारणं सांगणार आहोत.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सिनेमाची मुख्य जोडी, सिनेमाची गुंतवून ठेवणारी कथा, संगीत, सिनेमाचा व्हिलन आणि इतर अनेक कारणांसाठी असं वाटतं की या सिनेमाचा सिक्वेल बनला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एक व्हिलनमध्ये व्यवस्थित मांडल्या गेल्या होत्या त्यामुळे आता सिक्वेलकडून अपेक्षा वाढली आहे. 

जेव्हापासून सिक्वेलची घोषणा झाली आहे तेव्हापासून मोहित सुरीच्या या सिनेमात सिद्धार्थ आणि श्रद्धा ही जोडी एकत्र पुन्हा एकदा पाहायला मिळावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र या सिक्वेलमध्ये त्यांच्या चाहत्यांची निराशा जरी झाली असली तरी जॉन अब्राहम, तारा सुतारिया, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाचं शूटींग लॉकडाऊन पूर्णतः संपल्यावर सुरु होण्याची शक्यता आहे.  

sidharth malhotra and shraddha kapoor ek villain completed six year john abraham tara sutria


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sidharth malhotra and shraddha kapoor ek villain completed six year john abraham tara sutria