अभिषेक बच्चनने फराह खानला ट्रोल करत केली 'या' गोष्टीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

काही दिवसांपूर्वी कोरिओग्राफर फराह खान वर्कआऊट व्हिडिओ शेअर करणा-यांवर भडकली होती..याणि याच गोष्टीवरुन अभिषेक बच्चनने तिची खिल्ली उडवली आहे..

मुंबई-  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे...हा लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात देखील आला आहे..या दरम्यान प्रत्येकजण सोशल मिडियावर ऍक्टीव्ह आहेत...यात सेलिब्रिटीही मागे नाहीत..सेलिब्रिटी देखील त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तर कधी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसतात..यावेळी सेलिब्रिटी जर काही जास्तीत जास्त शेअर करत असतील तर ते म्हणजे त्यांचे वर्कआऊट व्हिडिओ..काही दिवसांपूर्वी कोरिओग्राफर फराह खान वर्कआऊट व्हिडिओ शेअर करणा-यांवर भडकली होती..याणि याच गोष्टीवरुन अभिषेक बच्चनने तिची खिल्ली उडवली आहे..

हे ही वाचा: सलमान खानच्या चाहत्यांसाठी खुषखबर..लवकरंच स्वतःचं युट्युब चॅनल करणार लॉन्च

फराहने ट्वीटवर नुकतंच लॉकडाऊनमुळे बदललेल्या जीवनशैलीवर मजेशीर ट्वीट केले होते...पहिल्या ट्वीटमध्ये फराह म्हणते, रोगविषयक शिक्षण- कपड्यांनी भरलेलं कपाट, आता जेव्हा सगळ्यांना केवळ दोन वेळाच कपडे घालायची गरज असते ..रात्रीच्या वेळची नाईटी आणि सकाळच्या वेळची नाईटी..

तर दुस-या ट्वीटमध्ये लिहिलंय, रोगविषयक शिक्षण २- माझे खरे मित्र कोण आहेत? माझे नवीन मित्र बाबुराम भाजीवाले, हिरापाल किराणा दुकानातील स्वप्निल, नोबल केमिस्टचा पवन आणि पीस्का फिसची नलिनी. धन्यवाद..

फराहचे हे दोन्ही मजेशीर ट्वीट वाचल्यानंतर कोणालाही हसू येईल..असंच काहीसं अभिषेकच्या बाबतीत झालं असावं..आणि म्हणूनंच अभिषेकने फराहच्या या ट्वीटवर रिप्लाय देत तिची खिल्ली उडवली आहे..अभिषेकने लिहिलंय, 'धन्यवाद, आता वर्कआऊट व्हिडिओ अपलोड कर..' अभिषेकने ही कमेंट करुन तिची मस्करी केली आहे..

खरतर फराह खानने नुकतंच सेलिब्रिटींना वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करण्यावरुन फटकारलं होतं..तिने सेलिब्रिटींना या व्हायरला गांभीर्याने घ्या आणि अशा काळात वर्कआऊट व्हिडिओ शेअर न करण्याचं आवाहन केलं होतं..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

BAS KARO yeh workout videos !! video shot by #diva

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder) on

abhishek bachchan trolls farah khan asks for workout video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan trolls farah khan asks for workout video