सलमान खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर..लवकरच स्वतःचं युट्यूब चॅनल सुरु करणार

Salman Khan
Salman Khan

मुंबई- लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच मनोरंजन करायचं कसं? याची एक साधी-सोप्पी युक्ती शोधून काढली ती सेलिब्रिटी मंडळींनी. सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडिओ, फोटो, पोस्ट शेअर करत सध्या ते प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. चित्रीकरणाच्या सततच्या धावपळीमध्ये कलाकार स्वतःच्या कामात हरवून जातात. प्रेक्षकांच मनोरंजन कसं करता येईल याकडेही लक्ष देत असतात. पण आता लॉकडाऊनच्या काळातही  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच मनोरंजन करण्यासाठी कलाकारमंडळी सज्ज झाली आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. सल्लुमियॉं लवकरच 'बिईंग सलमान खान' या नावाने युट्यूब चॅनल सुरु करणार आहे.

सलमान सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो सध्या त्याचा क्वारंटाईन वेळ पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवर घालवत आहे. त्याचा क्वारंटाईनवेळ नेमका कसा आहे? हे तो सतत सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो पोस्ट करत त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. आपला लाडका कलाकार खऱ्या आयुष्यात नेमका कसा आहे? हे जाणून घेण्यात प्रेक्षकांना अधिक रस असतो. आणि म्हणूनच सलमानला अधिक जवळून ओळखता येणार आहे ते त्याच्या नव्या युट्यूब चॅनमुळे. सलमान या युट्यूब चॅनलद्वारे नवनवीन व्हिडिओ तयार करणार आहे. हे युट्यूब चॅनल प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारही असेल. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी युट्यूबद्वारे सलमान प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

लॉकडाऊनच्या काळात सलमानचं हे युट्यूब चॅनल प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं नवं साधन असणार आहे. सलमानने एखादा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला की काही वेळातच त्याला लाखोंनी लाईक्स, व्ह्युज मिळतात. आता त्याचं हे नवं युट्यूब चॅनल कसं असणार? आणि हे चॅनल सलमान कधीलॉंच करणार? याच प्रतिक्षेत त्याचे चाहते आहेत. 

Salman Khan to launch his YouTube channel soon  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com