प्रदर्शनाआधीच 2000 कैद्यांनी पाहिला अभिषेक बच्चनचा 'दसवी'

आग्र्यातील सेंट्रल जेलमध्ये पार पडलेल्या 'दसवी' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिषेकनं सिनेमा दाखवायचं वचन येथील कैद्यांना दिलं होतं.
Abhishek Bachchan with Nimrat Kaur, Yami Gautam and others in Agra Central Jail.
Abhishek Bachchan with Nimrat Kaur, Yami Gautam and others in Agra Central Jail.Google

अभिषेक बच्चनचा(Abhishek Bachchan) 'दसवी' सिनेमा येत्या ७ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन तुषार जलोटानं केलं आहे. या सिनेमाला अद्याप प्रदर्शित होण्यास एक आठवडा अवकाश आहे. पण या सिनेमाच्या स्क्रिनिंगला मात्र सुरुवात झाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आग्र्यातील सेंट्रल जेलमध्ये हा सिनेमा दाखवला गेला. बॉलीवूडच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडताना दिसलं जिथे सिनेमाचं स्क्रीनिंग खास जेलमधील कैद्यांसाठी ठेवण्यात आलं. बातमी आहे की अभिषेकने असं वचन या कैद्यांना दिलं होतं.

Abhishek Bachchan with Nimrat Kaur, Yami Gautam and others in Agra Central Jail.
विल स्मिथला किस करणं पत्रकाराला पडलं होतं महागात,जुनं 'थप्पड' प्रकरण चर्चेत

अभिषेकच्या 'दसवी' सिनेमाचं शूटिंग आग्यातील जेलमध्ये पार पडलं आहे. आणि शूटिंग दरम्यान अभिषेकची येथील कैद्यांशी चांगली ओळख झाली. त्यामुळेच सिनेमा प्रदर्शनाच्या एक आठवडा आधीच अभिषेकनं कैद्यांना दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. येथील कैद्यांना मात्र हे सत्यात उतरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आग्र्यात जाऊन अभिषेकने तब्बल २००० कैद्यांसमोर सिनेमाचं स्क्रींनिंग केलं. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि इतर मेंबर्सनी सिनेमाच्या संपू्र्ण टीमचं जोरदार स्वागत केलं. अभिषेकसोबतच यामी गौतम(Yami Gautm),निम्रत कौर आणि दिग्दर्शक तुषार जलोटा हे सगळे जेलमधील त्या स्क्रीनिंगला उपस्थित राहिले होते. अभिषेक बच्चनने यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत एक भावूक पोस्टही त्यानं लिहिली आहे,''मी माझं काही वर्षांपूर्वी दिलेलं एक वचन पूर्ण केलं आहे. आमच्या 'दसवी' सिनेमाचं पहिलं स्क्रीनिंग आग्राच्या सेंट्रल जेलच्या गार्ड्स आणि कैद्यांसाठी आयोजित केलं होतं. आम्ही सिनेमाचं शूटिंग इथेच केलं होतं. त्यांच्या प्रतिक्रिया आमच्या कायम स्मरणात राहतील''. अशी पोस्ट ज्युनिअर बच्चनने केली आहे.

व्हिडीओमध्ये अभिषेक कैद्यांसोबत गप्पा मारताना देखील दिसत आहे. तसंच,जेलमध्ये फिरताना त्यानं सिनेमातलं 'मचा मचा' गाणं ज्याठिकाणी शूट झालं ती जागा देखील सोबत असलेल्या मीडियाच्या पत्रकारांना दाखवली. अभिषेकनं कैद्यांना जास्तीत जास्त पुस्तकं वाचता यावीत यासाठी जेलमधील लायब्ररीला पुस्तकं देखील दान केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com