
एका यूजरने सोशल मीडियावर अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण अभिषेकने दिलेल्या उत्तराने तो यूजर स्वत:च ट्रोल झाला आहे.
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ऍक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पोस्ट करत तो चाहत्यांशी गप्पा देखील मारत असतो. अभिषेकला बऱ्याचवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकवेळा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मात्र जेवढा तो ट्रोल होण्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच तो ट्रोलर्सना हजरजबाबपणे उत्तर देण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. नुकताच एका यूजरने सोशल मीडियावर अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण अभिषेकने दिलेल्या उत्तराने तो यूजर स्वत:च ट्रोल झाला आहे.
हे ही वाचा: भूषण प्रधानने केला भाग्यश्रीसोबतच्या नात्याचा खुलासा?
सोशल मीडियावर एका यूजरने एएनआयचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो एका शेतकऱ्याचा असल्याचं म्हटलं जातंय. फोटोमधील ही व्यक्ती अभिषेक बच्चन सारखी दिसत असल्याचं त्या यूजरनं म्हटलंय. ''जर अभिषेक 'बच्चन' नसता तर'' या आशयाचं ट्विट करत त्याने अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
अभिषेकने नेहमीप्रमाणे ट्रोलरना उत्तर देण्याचं ठरवलं. अभिषेक या यूजरला जशाच तसं उत्तर दिलंय.. त्याने ‘हाहाहा खूप मजेशीर आहे. पण तरीदेखील मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो’ अशा आशयाचं उत्तर अभिषेकने दिलं असून त्या यूजरलाच ट्रोल केलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेकने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.
If Abhishek wasn’t “Bachchan” pic.twitter.com/wcny9GU37v
— Gentle Giant (@iKunaal) November 9, 2020
abhishek reply when troller shares pic of farmer and writes if abhishek was not bachchan