Achani Ravi Passes Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते आचानी रवी यांचे 90 व्या वर्षी निधन

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माता आणि उद्योगपती अचनी रवी म्हणजेच रवींद्रनाथ नायर यांचे शनिवारी निधन झाले
Achani Ravi Renowned Malayalam producer passes away at 90, Kerala CM Pinarayi Vijayan pays tribute
Achani Ravi Renowned Malayalam producer passes away at 90, Kerala CM Pinarayi Vijayan pays tribute SAKAL

Achani Ravi Passes Away News: प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माता आणि उद्योगपती अचनी रवी म्हणजेच रवींद्रनाथ नायर यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी कोल्लम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या गावीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रताप नायर, प्रकाश नायर आणि प्रीता नायर ही मुले आहेत. रिपोर्ट्सनुसार त्यांची पत्नी उषा राणी यांचे 2013 मध्ये निधन झाले. ती एक प्रसिद्ध गायिका होती.

आचानी रवी यांनी चित्रपट उद्योगात निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनी 1970 ते 1980 च्या दशकात जनरल पिक्चर्स नावाचे बॅनर स्थापन केले.

त्यांच्या बॅनरमध्ये त्यांनी मल्याळममध्ये अनेक लोकप्रि सिनेमांची निर्मिती केली. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या अचनी या चित्रपटावरून त्यांना अचनी हे टोपणनाव देण्यात आले.

Achani Ravi Renowned Malayalam producer passes away at 90, Kerala CM Pinarayi Vijayan pays tribute
Sana Khan Baby Name: सना खानने लाडक्या लेकाचं ठेवलं अनोख नाव! लपलाय सुंदर अर्थ

अचनी रवींच्या कारकिर्दीतील आणखी एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा थंपू हा चित्रपट नुकताच २०२२ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शन दिवंगत चित्रपट निर्माते जी. अरविंदन यांनी केले होते आणि अचनी रवी यांनी निर्मिती केली होती.

कांचना सीता, थंपू, कुम्मत्ती, एस्तप्पन, पोक्कुवायिल, एलीप्पथायम, मंजू, मुखमुखम, अनंतराम आणि विधेयान हे आचानी रवींचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत. त्यांच्या शानदार कारकिर्दीत त्यांच्या चित्रपटांसाठी 20 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

मल्याळम चित्रपट उद्योगातील योगदानासाठी त्यांना जेसी डॅनियल पुरस्कार आणि केरळ राज्य चित्रपट पुरस्कार देखील मिळाला.

Achani Ravi Renowned Malayalam producer passes away at 90, Kerala CM Pinarayi Vijayan pays tribute
Anibani Movie: सहकलाकार झाले मित्र, आणीबाणी मध्ये एकत्र, उपेंद्र लिमये - वीणा जामकरची जोडी जमली

आचानी रवी यांचा जन्म कोल्लममधील एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला आणि त्यांनी वडिलांचा काजू व्यवसाय सांभाळला. त्यांचा व्यवसाय विजयलक्ष्मी काजू हा केरळमधील सर्वोत्तम आणि उच्च दर्जाचा काजू उद्योग म्हणून ओळखला जातो. निर्माता आणि व्यावसायिक असण्यासोबतच ते सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनी कोल्लममध्ये सार्वजनिक वाचनालय बांधले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com