'विद्युत जामवालची पॉवर पाहण्यासाठी, आर यु रेडी ? ' 

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

जानेवारीच्या 14 तारखेला त्याचा एक पॉवर मुव्ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी त्याच्या जोडीला श्रृती हसनही दिसणार आहे.

मुंबई - चित्तथरारक साहसी दृश्यांकरिता प्रसिध्द असलेल्या विद्युत जामवालचा अल्पावधीत मोठा फॉलोअर्स तयार झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे ते म्हणजे त्याचे स्टंट. त्यासाठी जगातील जे टॉपचे अॅक्शन हिरो आहेत त्यांना आव्हान देणारा अभिनेता आहे. सोशल मीडियावरही सतत तो वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना अॅक्शन ट्रीट देत असतो.

जानेवारीच्या 14 तारखेला त्याचा एक पॉवर मुव्ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी त्याच्या जोडीला श्रृती हसनही दिसणार आहे. विद्युतनं आतापर्यंत जे चित्रपट केले आहेत त्यातील त्याची अॅक्शन कमालीची लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे तो त्याचे स्टंट स्वतच करतो. त्याला दुस-या अॅक्शन कलाकाराची गरज नसते. हॉलीवूडच्या धर्तीवर बॉलीवूडमध्ये दमदार अॅक्शन हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. गेल्या वर्षी त्याचा खुदाहाफिज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झालेल्या या चित्रपटानं चांगला बिझनेस केला होता. आता तो पॉवर ऑन झीप्लेक्स' च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. झी एन्टरटेन्मेंटच्या पे-व्ह्यू-प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

क्राईम, थ्रिलर प्रकारातील या चित्रपटात शक्तीची कथा सांगण्यात आली आहे. जी कथा व्देष, राग, प्रेम याने व्यापलेली आहे. पॉवरची कथा एका कौटूंबिक कलाहात अडकलेली आहे. त्यात दोन प्रेमीयुगुलांचा प्रवास दाखविण्यात आला आहे. जो प्रेक्षकांना आवडेल अशी आशा दोन्ही कलाकारांना आहे. प्रेमात काय आहे, त्याची ताकद किती मोठी असते ते निभावताना किती संकंटांना धाडसानं सामोरं जावे लागते हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे.

कॉलेजचं तोंडही न पाहणारे बॉलिवूडचे स्टार सेलिब्रेटी; तरी मिळवलं सक्सेस !

याविषयी अधिक माहिती देताना झीप्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरिक पटेल म्हणाले,  "पॉवर हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे. प्रेक्षकांना सर्वोत्तम देणं हा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कथा त्याची प्रभावी मांडणी करण्याचे आव्हान आमच्यासमोर असणार आहे. सध्या मनोरंजनाच्या बाजारपेठेत मोठी स्पर्धा आहे त्यात आपला निभाव लागण्यासाठी दरवेळी प्रेक्षकांना काही वेगळं देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा चित्रपट आमच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action hero vidyut jamwal and shruti hassan new movie released soon January 14