त्या निव्वळ अफवाच, आमिर खानने ट्विट करत केला खुलासा

aamir khan
aamir khan
Updated on

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशभरात निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात यावी म्हणून हजारो हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कलाविश्वातील बऱ्याच मंडळींनी पुढे येऊन आर्थिक हातभार लावला. तर काहींनी स्वतःचे हॉटेल्स, ऑफिसेस कोरोनाग्रस्त, वैद्यकीय कर्मचारी, पोलिसांना राहण्यासाठी देऊ केले. आपला देश या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावा म्हणून अजूनही कलाविश्वातून मदतीचा ओघ सुरुच आहे. मात्र या परिस्थितीमध्ये बऱ्याच अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यातीलच एक अफवा अभिनेता आमिर खानबाबत सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. आमिरने पिठाच्या पिशवीमधून 15 हजार रुपये वाटले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. 

यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  खरंच आमिरने पिठामधून पैसे वाटले का? यामागचं नक्की सत्य काय? हे आता आमिरनेच त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत सांगितले आहे. 'पिठाच्या पिशवीमध्ये पैसे टाकणारी व्यक्ती ती मी नाही. खरं तर ही पूर्णपणे खोटी बातमी आहे किंवा कोणी तरी रॉबिन हूड असेल ज्याला आपली ओळख उघड करण्याची इच्छा नसेल सुरक्षित राहा.' असे ट्विट आमिरने केले आहे.

आमिरच्या या ट्विटमुळे निव्वळ अफवा असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिल्लीमधील एका वस्तीमधील हा व्हिडिओ होता. या वस्तीमध्ये एक ट्रक आला आणि या ट्रकमध्ये एक एक किलोच्या पिठाच्या पिशव्या होत्या. ज्यांना गरज असेल त्यांनी या पिशव्या घेऊन जाव्यात असे या ट्रकमधील मंडळींकडून सांगण्यात आले.

एका कुटुंबामागे एक पिशवी देण्यात आली. तेथील वस्तीमधील लोकांनी या पिठाच्या पिशव्या उघडून पाहिल्या तेव्हा त्यामध्ये 15 हजारांच्या नोटा आढळल्या. आमिरला आपण करत असलेली मदत कोणालाच माहिती पडू द्यायची नव्हती म्हणून त्याने हे सारं केलं असल्याचं या व्हिडिओमधील एका व्यक्तीने सांगितले. यावर आमिरने अजूनही स्पष्टीकरण दिले नव्हते. पण आता आमिरच्या या ट्विटनं खरं सत्य उघडकीस आलं आहे. 

actor aamir khan on distributing money in wheat bags

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com