Gumraah Box Office: आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' पण गेला डब्यात... दोन दिवसात केली एवढी कमाई

2013 मध्ये रिलीज झालेल्या आशिकी 2 च्या सुपरहिटनंतर आदित्य रॉय कपूरचे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले होते.
aditya roy kapur
aditya roy kapurSakal
Updated on

2013 मध्ये रिलीज झालेल्या आशिकी 2 च्या सुपरहिटनंतर आदित्य रॉय कपूरचे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले होते. आजकाल तो ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या गुमराह या चित्रपटामुळे चर्चेत होता. यामध्ये त्याच्यासोबत मृणाल ठाकूर दिसली आहे. आदित्यचा हा चित्रपटही काही कमाल दाखवू शकलेला नाही.

पहिल्या शुक्रवारी गुमराहने बॉक्स ऑफिसवर अवघ्या 1.10 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची अवस्था अशीच होती. वृत्तानुसार शनिवारच्या कलेक्शनचा अंदाजे आकडा फक्त 1.25 कोटी आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन पाहता गुमराह बॉक्स ऑफिसवर खूपच सुस्त कामगिरी करत असल्याचे म्हणता येईल. दोन दिवसांत या चित्रपटाने केवळ 2.35 कोटींची कमाई आपल्या नावावर केली आहे. त्याचवेळी हा चित्रपट आपल्या बजेटचा आकडा इतक्या वेगाने पार पाडू शकेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वृत्तानुसार, या चित्रपटासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

aditya roy kapur
Urfi Javed: वयाच्या 15 व्या वर्षी उर्फी जावेदच्या फोटोंचा झाला गैरवापर, कुटुंबीयांनीही म्हटलं 'पॉर्न स्टार'

या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्धन केटकर यांनी केले आहे. तर आदित्य मुख्य भूमिकेत आहे, ज्याची चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. तर मृणाल पोलिसांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे, ज्याच्या उत्तरार्धात अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळतात.

गुमराहसोबतच अजय देवगणचा भोला हा चित्रपटही सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे, जो 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. दुसरीकडे आदित्यच्या चित्रपटाची टक्कर भोलाशी आहे. भोला रिलीज होऊन 10 दिवस झाले आहेत. दुसरीकडे, रिपोर्ट्सनुसार, 10व्या दिवशी भोलाने अंदाजे 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com