esakal | HBD अल्लू अर्जुन; प्रवास साऊथच्या स्टायलिश स्टारचा
sakal

बोलून बातमी शोधा

Allu arjun

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील हा अभिनेता त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊयात. 

HBD अल्लू अर्जुन; प्रवास साऊथच्या स्टायलिश स्टारचा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत स्टायलिश स्टार अशी ओळख असलेल्या अल्लू अर्जूनचा आज वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने आणि हटके स्टाइलने तो नेहमीचं प्रेक्षकांची मनं जिंकतो. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील हा अभिनेता त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊयात.

अल्लू अर्जुनला अभिनयाचं बाळकडू घरातच मिळालं. चेन्नईत अल्लू अर्जुनचा जन्म 8 एप्रिल 1983 रोजी झाला. त्याचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे प्रसिध्द विनोदवीर आहेत. तसेच वडिल अल्लू  अरविंद हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. तेलगू सुपरस्टार चिरंजीवीचा तो भाचा आहे. घरातच दिग्गज अशा चित्रपट क्षेत्रातील जाणकार आणि कलाकारांच्या सहवासात अल्लू अर्जुन लहानाचा मोठा झाला. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली होती. विजेता या चित्रपटात त्याने बालकालाकाराची भूमिकाही केली. याशिवाय डॅडी चित्रपटात डान्सरची भूमिका केली. अल्लू अर्जुनचा अभिनय क्षेत्रातील प्रवास त्यानंतर सुरू झाला. 2003 मध्ये गंगोत्री या चित्रपटात अल्लू अर्जुनने काम केले. 

अल्लू अर्जुन अतिशय लक्झरियस लाईफ जगतो. महागड्या गाड्यांची प्रचंड आवड असलेल्या अल्लू अर्जुनकडे बीएमडब्ल्यू , जग्वार, ऑडी आणि रेंज रोवर या गाड्या आहेत. अल्लू अर्जुनचा 100 कोटींचा बंगला आहे. 2016 मध्ये तो सर्वात जास्त गूगलवर सर्च केलेला टॅलिवूड स्टार ठरला होता. एका मिडीया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन वर्षाला 15 कोटींची कमाई करतो.   

लक्झरियस आयुष्य जगणाऱ्या या सुपर स्टारची लव स्टोरी देखील हटके आहे. अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांची ओळख एका मित्राच्या लग्नात झाली. पहिल्या भेटीतच अल्लूला स्नेहा आवडली. त्यानंतर दोघांनी बोलायला सुरूवात केली. स्नेहा तिचे शिक्षण अमेरिकेत पूर्ण करून भारतात आली होती. पहिल्यांदा अल्लू अर्जुनला भेटली तेव्हा तिला अल्लू अर्जुन चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार आहे हे तर माहिती नव्हतंच. स्नेहा ही हैद्राबादमधील एका प्रसिध्द व्यवसायिकांची मुलगी आहे. 

अल्लूच्या वडिलांनी दोघांच्या नात्याला तेव्हा मान्यता दिली नव्हती. अल्लूने खूप विनवणी केल्यानंतर त्याच्या वडिलांनी स्नेहा आणि अल्लूला लग्नाची परवानगी दिली. त्यानंतर अल्लू अर्जुनच्या घरच्यांनी स्नहेच्या घरच्यांकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण त्यांनी लग्नाला नकार दिला. बरेच दिवस स्नेहा आणि अल्लू अर्जुन घरच्यांना त्यांच्या लग्नासाठी परवानगी मागत होते. शेवटी त्यांनी होकार दिल्यानंतर ६ मार्च २०११ रोजी हैदराबाद येथे अल्लू अर्जुनचे लग्न स्नेहा रेड्डीसोबत झाले. त्यांना अयान नावाचा मुलगा व अर्हा नावाची मुलगी आहे. सन २०१६ मध्ये अल्लू अर्जुनने एम किचन आणि बफॅलो वाईल्ड विंग्स सोबत ८०० ज्युबली नावाचे नाईटक्लब चालू केले

आर्या, सन ऑफ सत्यमुर्ती, येवडू , डीजे ,सरैनोडू, बद्रीनाथ, बनी , हैप्पी या हिट चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुनने काम केले आहे. त्याच्या अला वैकुंठपुरमलो हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

loading image